तरुण भारत

गोकुळवाडी सखळीत आढळले जिवंत नवजात बालक

बालक मुलगी असल्याचे सिध्द. जन्मानंतर अवघ्या 2 तासातच सोडले रस्त्याच्या बाजूला. साखळीत संताप. गोमेकॉत रवाना.

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

गोकुळवाडी सखळी येथील सरकारी सामाजिक रूग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या लोकवस्तीत एका रस्त्याच्या बाजूला काल सोम. दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 7 वा. च्या सुमारास एक नवजात अर्भक आढळून आले. रस्त्याच्या बाजूला प्लास्टिक पिशवीत बंद करून सदर अर्भकाला रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले होते. डिचोली पोलिसांनी सदर नवजात बालकाला ताब्यात घेऊन त्याची प्राथमिक तपासणीनंतर गोमेकॉत रवाना करण्यात आले.

  सदर प्रकार काल सोमवारी गोकुळवाडी येथे घडला. येथे असलेल्या लोकवस्तीत रस्त्याच्या बाजूला सदर नवजात बालकाला प्लास्टिक पिशवीत लपेटून चिकटपट्टी लावून ठेवण्यात आले होते. सकाळी सातच्या सुमारास सदर पिशवीतून रडण्याचा आवाज येत असल्याने स्थानिकांनी पोलिसांना कल्पना दिली. तसेच सदर बालकाला पिशवीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच पोलीस नियंत्रण कक्षाचे वाहन त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी सदर पिशवीचे आवरण खोलून बालकाला खोलले. व ताब्यात घेतले.

   या प्रकरणी डिचोली पोलिसांनी निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी व परिसरात कोणा महिलेची प्रसूती झाली आहे का, याची झडती घेतली. परंतु त्यांच्या हाती काहीच लागू शकले नाही. सदर बालक हे दोनच तासांपूर्वी जन्माला आले होते, असे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट झाले. मुलगी असल्याने त्याला अशा प्रकारे रस्त्याच्या बाजूला कोणीतरी सोडले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बालकाचे भाग्य चांगले म्हणून ते सहीसलामत

  सदर बालकाचे भाग्य चांगले म्हणून ते आज सहीसलामत पोलिसांच्या आणि नंतर गोमेकॉत पोहोचले. जन्मदात्या मातापित्यांनी तर या बालकाला अंतिम क्षणासाठीच रस्त्याच्या बाजूला चक्क प्लास्टिकच्या पिशवीत लपेटून सोडले होते. रडण्याचा आवाज स्थानिकांना आल्याने सदर बालकाचा जिव वाचला. जर सदर बालकाला कोणत्याही निर्जनस्थळी सोडले असते तर त्याचा जिव वाचणे कदाचित मुश्कलि बनले असते. तसेच लोकवस्तीपासून जरा दूरच जर त्याच अवस्थेत ठेवले असते, तर ते कदाचित श्वानांचाही बळी ठरू शकले असते. मने पिळवटून टाकणाऱया या प्रकारामुळे यावेळी डय़?टीवरील पोलिसही भावनिक बनले होते. तर हे दुष्कृत्य करणाऱया विरोधात अनेकजण शिव्यांची लाखोलीही वाहत होते. जन्मानंतर अवघ्या दोन तासांतच आपल्या पोटच्या नवजात गोळय़ाला रस्त्यावर सोडणे, असे प्रकार करण्यास या लोकांना हात तरी कुठून येतात. त्यांच्या अंगातील माणूस इतका कसा काय निर्दयी असू शकतो ? हेच प्रश्न आज साखळीतील लोकांना सतावत होते.

या प्रकरणी डिचोली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला असून डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रजित मांदेकर अधिक तपास करीत आहे.

Related Stories

पणजी ‘हॉटस्पॉट’च्या दिशेने, रुग्णसंख्या 122

Omkar B

…तर कळंगुटचे गावपणच संपेल

Amit Kulkarni

पेडणे मतदारसंघात भाजप पक्षाचे कमळ फुलणार

Amit Kulkarni

वेर्णा महामार्गावरील अपघातात कारचालक महिला जागीच ठार

Patil_p

वेतनश्रेणी लागू करा किंवा नोकरीत कायम करा

Amit Kulkarni

राज्य विधानसभेचे अधिवेशन आज

Patil_p
error: Content is protected !!