तरुण भारत

पुंकळ्ळी पालिका मंडळाची आज पहिली बैठक

स्वातंत्र्यसैनिक स्मारकाजवळच्या उद्यानाच्या डागडुजीसंदर्भात ठराव घेण्याची तयारी

प्रतिनिधी / कुंकळ्ळी

Advertisements

नवनिर्वाचित कुंकळ्ळी नगरपालिका मंडळाची पहिली बैठक आज मंगळवार 6 रोजी सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे. या पहिल्याच बैठकीत स्थायी समिती तसेच अन्य उपसमित्यांची निवड करण्याचा ठराव घेण्यात येणार आहे. तसेच मान्सूनपूर्व कामांविषयी चर्चा व निर्णय होणार आहेत. याशिवाय कुंकळ्ळी कदंब बसस्थानकाच्या परिसरात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाजवळ बांधलेल्या उद्यानाची डागडुजी करण्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण ठराव घेण्याची तयारी मंडळाने चालविली आहे. सदर उद्यानाचा खर्च युरी आलेमाव करणार आहेत. कुंकळ्ळीचे माजी आमदार ज्योकीम आलेमाव यांच्या मंत्रिपदाच्या काळात येथील स्वातंत्र्यसैनिक स्मारकाजवळ उद्यान बांधले होते. त्यानंतर मात्र कुणीही त्याकडे लक्ष दिले नसल्याबद्दल खंत व्यक्त करून या दुर्दशेला युरी आलेमाव यांनी मागील मंडळाला जबाबदार धरले आहे. नव्या मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी पालिकेकडे आल्यावेळी त्यांनी अभिनंदन करताना स्मारकाचा विषय काढला होता. त्याचवेळी डागडुजीचा संपूर्ण खर्च आपण करणार असे त्यांनी जाहीर केले होते व पालिका मंडळाने त्यासंदर्भात ताबडतोब ठराव घ्यावा असे आवाहनही केले होते. हा विषय तापण्याची शक्मयता असून सरकारी निधीतून बांधलेल्या उद्यानाची डागडुजी खासगी खर्चातून का असा सवाल काही माजी नगरसेवकांनी उठवायला सुरुवातही केली आहे.

Related Stories

ऑनलाईन कर वसुलीसाठी मडगाव पालिकेचे प्रयत्न

Omkar B

पाच पालिकांसाठी आज मतदान

Amit Kulkarni

उसळणाऱया गर्दीमुळे कोरोनाच्या प्रसाराची भीती

Patil_p

…..अन् पोलिसांनी केला भर रस्त्यावरच वाढदिवस

Omkar B

जोसेफ सिक्वेरा यांचा भाजपमध्ये प्रवेश

Patil_p

केजरीवाल यांचा आजपासून गोवा दौरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!