तरुण भारत

रस्त्यावरील खडीमुळे अपघाताचा धोका

बेळगाव : येथील कपिलेश्वर कॉलनी रिद्धीसिद्धी विनायक मंदिरानजीकच्या रस्त्यावर पेव्हर्स  बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी येथील रस्ता सपाट करून त्यावर खडी घालण्यात आली आहे. मात्र, या खडीमध्ये अनेक वाहने घसरून अपघात घडत असल्यामुळे वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हे रखडलेले काम वेळेवर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

या ठिकाणी आठवडाभरापूर्वी पेव्हर्स  बसविण्याकरिता रस्त्याचे काम चालू करण्यात आले आहे. त्यामुळे पेव्हर्सही आणून ठेवले आहेत. मात्र ते बसविण्यास दिरंगाई करण्यात येत आहे. रस्त्यावर घातलेल्या खडीवर दुचाकी घसरून वाहनधारक जखमी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

Advertisements

या ठिकाणी पेव्हर्स आणूनसुद्धा ते बसविण्यास दिरंगाई करण्यात येत असल्याने येथील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी येथील विकासकामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

शिक्षक संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

Patil_p

मिशन मार्कंडेयतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वितरण

Amit Kulkarni

मनपा कार्यालयातील अधिकाऱयांचे बदलीसत्र

Patil_p

कणकुंबी-पारवाड ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

Amit Kulkarni

बेळगाव-धारवाड नव्या रेल्वे मार्गासाठी 335 हेक्टर होणार जमिन संपादन

Patil_p

फुटलेल्या जलवाहिनीची कायमस्वरुपी दुरूस्ती करा

Patil_p
error: Content is protected !!