ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात रविवारी एक लाखांच्यावर पोहचलेली बाधितांची संख्या सोमवारी किंचितशी घटली. मागील 24 तासात 96 हजार 982 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 446 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 26 लाख 86 हजार 049 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 65 हजार 547 एवढी आहे.
सोमवारी 50,143 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 32 हजार 279 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 7 लाख 88 हजार 223 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 8 कोटी 31 लाख 10 हजार 926 जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 25 कोटी 02 लाख 31 हजार 269 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 12 लाख 11 हजार 612 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.05) करण्यात आल्या.