तरुण भारत

कराडमध्ये व्यापाऱ्यांचा मिनी लॉकडाऊनला विरोध

पृथ्वीराज चव्हाण यांची घेतली भेट

कराड / प्रतिनिधी : 

Advertisements

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाने कराडच्या व्यापारी वर्गात मोठी नाराजी पसरली असून मिनी लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. गेले वर्षभर कोरोनाच्या दुष्टचक्रात व्यापारीवर्ग भरडला गेला असताना पुन्हा लॉक डाऊनची आपत्ती आली आहे. यातून दुकाने काही वेळ सुरू ठेवण्यास सवलत मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन केली. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिवांशी बोलण्याचे आश्वासन चव्हाण यांनी व्यापाऱ्यांना दिले.

आजपासून 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्रित येत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. चव्हाण यांनी कालच उपजिल्हा रुग्णालयात लस घेतली असून प्रकृती बरी नसतानाही त्यांनी व्यापारी वर्गाच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले.

गेले वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक परिस्थिती सुधारत असताना आता पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांसह दुकानातील कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शुक्रवार ते रविवार दुकाने बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा होता. असे असताना संपूर्ण आठवडाभर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अचानक जारी करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या व्यापाऱ्यांना रोज दुकाने काही वेळ सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. शहरातील काही दुकानात 10 पेक्षा जास्त कामगार कामाला आहेत. अशा दुकानात सोशल डिस्टन्स कसे ठेवायचे आणि अशा दुकानात कारवाई का करण्यात आली, अशी तक्रार करण्यात आली. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाने गेल्या दोन दिवसात काढलेल्या अध्यादेशाची पाहणी करत व्यापारी वर्गाने लसीकरण प्राधान्याने करून घेणे आवश्यक आह. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे सांगत त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांना फोन करून शहरातील व्यापाऱ्यांना लसीकरणासाठी वेगळी सोय उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यावर शिंदे यांनी शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू असून यातील एका केंद्रावर व्यापाऱ्यांचे लसीकरण सोय करण्याची सोय करण्यात येईल, असे सांगितले.

दरम्यान, व्यापाऱ्यांच्या अडचणी संदर्भात उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्य सचिवांशी बोलून अत्यावश्यक सेवेतील दुकानाबाबत काही सुधारणा करून व्यापाऱ्यांना सवलत देता येते का, याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी स्वतः व दुकानातील कामगारांची लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केल्याशिवाय दुकान उघडता येणार नाहीत, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.जितेंद्र ओसवाल, नितीन ओसवाल, चेतन मेहता, राहुल शहा, बाळासाहेब भंडारी, मोहसीन बागवान, अशिर बागवान, अंकुर ओसवाल यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. माजी नगरसेवक अशोकराव पाटील, राहुल चव्हाण उपस्थित होते.

Related Stories

सातारा शहरात पाण्याचा ठणाणा

triratna

सातारा जिल्ह्यातील ९५ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

triratna

जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; मंत्री देसाई यांचे पोलिसांना आदेश

datta jadhav

सातारा : डबेवाडी हद्दीत उसाचा ट्रॅक्टर घसरला, चालक जखमी

datta jadhav

कराडात महिला चोरांची टोळी गजाआड

Amit Kulkarni

औंध पोलिसांनी पकडला 75 पोती गुटखा

Patil_p
error: Content is protected !!