तरुण भारत

कोविड काळातही एफपीआयचा भारतीय बाजारावर विश्वास

आर्थिक वर्षात केली 2.74 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली  ः मागील काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा हा जगासोबत भारतालाही राहिला आहे. विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी (एफपीआय) मागच्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2020-21 मध्ये भारतीय बाजारात जवळपास 2,74,034 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोविड महामारीच्या दरम्यान एफपीआयने भारतीय शेअरबाजार व भारतीय अर्थव्यवस्थेमधील आपला विश्वास कायम ठेवला असल्याचे वरील आकडेवारीमधून समोर आले आहे.

Advertisements

मागच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारतीय शेअर बाजारात क्रमशः 6,884 कोटी रुपये आणि 7,783 कोटी रुपये काढले आहेत. अर्थमंत्रालयाच्या एका माहितीनुसार अर्थव्यवस्थेमधील वाढता विश्वास आणि सुधारणात्मक कल तसेच कल्पकतेने विविध क्षेत्रांना दिलेल्या पॅकेजमुळे भारतीय अर्थव्यवस्था सावरू शकली. सदरच्या काळात बाजारातील एफपीआयमध्ये मोठी गुंतवणूक प्राप्त झाली आहे.

सरकार आणि नियामकांमधून एफपीआयसाठीची पोहच आणि गुंतवणुकीमधील सुधारणात्मक स्थिती याने एफपीआयची स्थिती बदलत गेली आहे. यामध्ये सेबीजवळ असणाऱया नोंदणीकृत ऑनलाईन निवेदन अर्ज, पॅनसह बँक आणि डीमॅट खाते उघडण्यासह उपायांचा समावेश आहे.

Related Stories

कर्नाटकः आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करीत फेसबुकवर फसवणुकीचा प्रयत्न

Abhijeet Shinde

क्रीडा संकुलातील कोविड हॉस्पिटल सुरु

Patil_p

अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर दर्शनासाठी बंद

Patil_p

एप्रिल फूल साजरा करणार नाही : गुगल

tarunbharat

सोलापूर : बार्शीत रेशन काळ्याबाजाराची साखळी सुरूच, आज परत 41 पोती जप्त

Abhijeet Shinde

नववर्षाच्या स्वागतप्रसंगी आव्हानांची सोबत

Patil_p
error: Content is protected !!