तरुण भारत

ओप्पो एफ 19 भारतात लाँच

मुंबई

 ओप्पोने मंगळवारी आपला नवा ओप्पो एफ 19 हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ट्रिपल रियर कॅमेरा आणि होल पंच डिझाइन ही या स्मार्टफोन्सची वैशिष्टय़े सांगितली जात आहेत. 33 डब्ल्यू चार्जिंगला हा फोन सहाय्य करतो. याआधी कंपनीने भारतीय बाजारात ओप्पो एफ 19 प्रो व प्रो प्लस हे फोन लाँच केले होते. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 18 हजार 990 रुपये इतकी ठेवण्यात आली असून 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह हा फोन सादर करण्यात आला आहे. निळा, काळय़ा रंगात हा फोन देशात ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्यक्ष विक्री 9 एप्रिलला सुरू होणार आहे.

Advertisements

Related Stories

ओप्पोचे इ स्टोअर मेमध्ये होणार सुरू

Amit Kulkarni

‘पोको एम 3’ स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

‘iPhone 11’चे भारतात उत्पादन सुरू

datta jadhav

डेलला भारतात मिळतेय वाढती पसंती

Amit Kulkarni

मोटोरोलाचा इ 7 स्मार्टफोन सादर

Omkar B

सॅमसंगचा 5-जी स्मार्टफोन लवकरच

Patil_p
error: Content is protected !!