तरुण भारत

चढउताराच्या प्रवासात सेन्सेक्सची तेजीची झुळूक

सेन्सेक्स 42 तर निफ्टी 45 अंकांनी वधारले

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisements

देशामध्ये पुन्हा कोरोना संसर्ग नव्याने वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे याचा काहीसा प्रभाव हा भारतीय शेअर बाजारातील कामगिरीवर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. याचाच भाग म्हणून चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत चढउताराचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिवसभरातील कामगिरीनंतर दिग्गज कंपन्यांच्या जोरावर सेन्सेक्स 42.07 अंकांनी वधारुन निर्देशांक 49,201.39 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 45.70 अंकांनी वाढून निर्देशांक 14,683.50 वर बंद झाला आहे. या अगोदरच्या दिवशी सोमवारी सेन्सेक्सने दिवसभरात एकावेळी सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला होता.

देशातील प्रमुख राज्यांमध्ये विविध ठिकाणी लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती सुधारण्याचा वेग संथ राहण्याच्या काळजीने पुन्हा एकदा गुंतवणूकदार काळजीत पडले असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये दिग्गज कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, एचसीएल टेकसह एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला व्यवसाय वाढीमुळे अदानी पोर्टस्चे समभाग जवळपास 14 टक्क्यांच्या वाढीसोबत बंद झाले आहेत.


धातू व औषध क्षेत्र मजबूत 

मंगळवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सर्वाधिक धातू आणि औषध क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची मजबूत खरेदी झाली आहे. निफ्टीत जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग 3.8 टक्क्यांनी वाढले आहेत. याप्रकारे सेन्सेक्समधील 30 मधील 17 समभाग वाढीसह बंद झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पुन्हा कोरोनाची चिंता

देशातील विविध राज्यांमधील काही ठिकाणी पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढताना दिसून येत आहे. यामुळे आर्थिक क्षेत्रासह शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये काळजीचे ढग निर्माण झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Related Stories

शेअर बाजारात परतला उत्साह, सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

Patil_p

ऍमेझॉन – शेतकऱयांसाठी मोबाईल ऍप

Patil_p

2019-20 मध्ये सोने आयात घटली

Patil_p

देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे एसबीआयचे संकेत

Omkar B

पतंजली समूहाची उलाढाल 30 हजार कोटींवर

Patil_p

अदानींची कंपनी 5 हजार कोटींचा आयपीओ आणणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!