तरुण भारत

वधू निघाली चक्क बहिण

विवाहाच्या दिवशी झाला उलगडा

चीनमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. येथे एक विवाह होत असताना नवऱया मुलाची आईची नजर वधूच्या हातांवर पडली. त्यानंतर जे घडले, त्याची कल्पना कुणी स्वप्नात देखील केली नसेल. नवऱया मुलाची आई जोरजोरात रडू लागली.

Advertisements

भाऊबहिण निघाले

ज्या जोडप्याचा विवाह होत होता, ते चक्क भाऊबहिण निघाले. महिलेने वधूच्या हातांवरील जन्मखुण पाहिली. त्यानंतर तिने त्वरित स्वतःच्या मुलीला ओळखले. ही घटना चीनच्या जिआनग्सू प्रांतातील सोझोऊ येथील आहे. हा विवाह 31 मार्च रोजी होणार होता. हातावरील जन्मखुण पाहिल्यावर संबंधित महिलेने वधूला तिच्या आईवडिलांविषयी विचारले. यावर 20 वर्षांपूर्वी संबंधित रस्त्याच्या कडेला सापडल्यावर आपल्याला दत्तक घेण्यात आले होते असे उत्तर वधूने दिले होते.

विवाह थांबला नाही..

नात्यांचा उलगडा होताच वधू स्वतःच्या आईला भेटून रडू लागली. या प्रकारात आणखी एक चकित करणारे वळण म्हणजे विवाहसोहळा थांबविण्यात आला नाही. कारण नवऱया मुलालाही या महिलेने दत्तकच घेतले होते. वधूच्या खऱया आईचा या विवाहावर कुठलाच आक्षेप नव्हता.

नशीबाचा खेळ

20 वर्षांपूर्वी या महिलेची मुलगी बेपत्ता झाली होती, तेव्हा तिने मुलीचा खूप शोध घेतला होता. पण मुलगी न मिळाल्याने महिलेने एका मुलाला दत्तक घेतले होते. आता याच मुलाशी तिच्या मुलीचा विवाह झाला आहे.

Related Stories

‘या’ किनाऱ्यावर आढळले 18 मृत देवमासे

datta jadhav

ब्राझीलमध्ये 36 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

सौदी अरेबियात 3 राजपुत्रांना अटक

tarunbharat

जपान, अमेरिका, फ्रान्सचा युद्धसराव

Patil_p

असा आहे इम्रानचा ‘नया’ पाकिस्तान

Patil_p

अमेरिकेच्या संसदेत हिंसाचार : 4 ठार

Patil_p
error: Content is protected !!