तरुण भारत

सातारा : बहिणीला त्रास देणाऱ्याचा खून करुन जाळले

सातारा शहरातील थरारक प्रकार

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

एकीकडे वाढता कोरोना बाधित संख्या व लॉकडाऊनच्या तणावात सातारकर असताना मंगळवारी सकाळी रविवार पेठेतील खंडोबाच्या माळावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने केवळ तीन तासात या खून प्रकरणी तिघांना अटक करत खुनाच्या घटनेचा उलगडा केला असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.

याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ तसेच एलसीबीच्या तपास पथकातील टीम उपस्थित होती.  आकाश उर्फ रॉजर राजेंद्र शिवदास (रा. रामनगर, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आकाश हा विक्रांत कांबळे याच्या बहिणीला त्रास देत असल्याने त्याचा विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे (वय 19), तेजस नंदकुमार आवळे (वय 19), संग्राम बाबू रणपिसे (वय 28, तिघेही रा. रविवार पेठ सातारा) या तिघांनी खून केल्याचे समोर आले असल्याचे बंसल यांनी सांगितले.

याबाबतची सविस्तर हकीकत अशी, सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथे मंगळवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा खून करुन त्याचा मृतदेह जाळून टाकला असल्याची घटना समोर आल्यावर एसपी बंसल यांच्या अपर पोलीस अधिक्षक पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक दलाल, पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी घटनास्थळी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी कोणत्यातरी अज्ञात इसमाचा खून करुन त्याचा मृतदेह जाळून पुरावा नाहीसा केल्याचे निदर्शनास आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील साक्षीदार व गोपनीय माहिती प्राप्त करत मृत व्यक्ती आकाश राजेंद्र शिवदास असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरुन विक्रांत कांबळे, तेजस आवळे व संग्राम रणपिसे या संशयितांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी दि. 6 रोजी मध्यरात्री खंडोबाचा माळ येथे डोक्यात दगड घालून आकाश शिवदास याचा खून केला व त्याचा मृतदेह जाळून टाकला असल्याचे सांगितले.

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर आकाश शिवदास याचे नातेवाईक सातारा शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात जमा झाले होते. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणाव वाढला होता. मात्र, पोलिसांनी केवळ तीन तासात खुनाचा छडा लावून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तपास पथकाचे वरिष्ठांकडून अभिनंदन

पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, सहाय्यक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, हवालदार कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, प्रविण पवार, अमित सपकाळ, कॉन्स्टेबल रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, गणेश कचरे, पंकज बेसके यांनी कारवाईत सहभाग घेतला. या पथकाचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.

केवळ तीन तासात खुनाचा छडा

या गुन्हयाचे तपासामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी सहकार्य केले. गुन्हयाचे तपासात जळालेला मृतदेह पुरुष की स्त्राr याबाबत खात्री होत नसताना तसेच कोणताही पुरावा नसताना अत्यंत कमी वेळत मयताची ओळख पटवून हा क्लिष्ट गुन्हा 3 तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी हा उघडकीस आणला आहे.

Related Stories

शिरोळ पंचायत समिती सभापती मिनाज जमादार यांचा राजीनामा

Abhijeet Shinde

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकयांचे बिघडले आर्थिक गणीत

Patil_p

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 31.74 टी.एम.सी. पाणीसाठा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : डॉ. उत्तम मदने 24/7 कार्यरत

Abhijeet Shinde

अंत्यसंस्कारासाठी दहा हजाराची मागणी

Patil_p

साताऱ्यात दोन पोलीस अधिकाऱ्यासह 15 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!