तरुण भारत

आणखी दोघांचा मृत्यू , 138 नवे रुग्ण

मंगळवारी 58 जण कोरोनामुक्त

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

रत्नागिरी जिह्यात सलग दुसऱया दिवशी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आह़े मृतांमध्ये रत्नागिरीमधील 88 वर्षीय व संगमेश्वर मधील 56 वर्षीय पुरूषाचा समावेश आह़े मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण व मृतांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आह़े

    जिल्हा शासकीय रुग्णालायकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत 438 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 98 तर ऍन्टीजेन चाणीत 40 असे एकूण 138 कोरोना रुग्ण आढळून आल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 32 दापोली 8, खेड 13, गुहागर 41, चिपळूण 42 व लांजातील 2 रुग्ण आहेत़े यामुळे जिह्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 708 झाली आह़े 58 बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे बरे झालेल्यांची संख्यात 10 हजार 468 पर्यंत पोहचली आह़े बरे होण्याचे प्रमाण 89.41 झाले आह़े जिह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या 382 व  मृत्यूदर 3.26 झाला आह़े

एकूण रुग्ण -11708

नवे रुग्ण -138

मृत्यू -02

एकूण मृत्यू – 382

आमदार योगेश कदम कोरोनाबाधित

दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी स्वतः फेसबुक पेजवर आपण कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट केले आहे. आपली प्रकृती व्यवस्थित असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम हेदेखील काही दिवसांपूर्वीच कोरोना बाधित आढळले होते.

  शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना निर्बंध

रत्नागिरी जिह्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना भेटण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली . वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे. अत्यावश्यक काम असेल तर  निर्देषांची अंमलबजावणी करून प्रवेश देण्यात येणार आहे.

Related Stories

अडूरमधील चोरटे 36 तासांत गजाआड

Patil_p

मराठा आरक्षण प्रश्नावर मंडणगड तहसीलला निवेदन

Patil_p

तळवणेत ‘हेल्पलाईन’ने सावरले घर

NIKHIL_N

रत्नागिरीत बनवली ‘आयएनएस खुकरी’ची प्रतिकृती

Omkar B

आंबा वाहतुकीच्या वाहनातून चाकरमानी आणल्याने गुन्हा

NIKHIL_N

नदी प्रदूषण प्रकरणी टंकरचा शोध सुरू

Patil_p
error: Content is protected !!