तरुण भारत

बीएससी, एएसयूजी संघ विजयी

बेळगाव : एमसीसीसी ऍकॅडमी आयोजित हनुमान चषक 14 वर्षाखालील निमंत्रितांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने एमसीसीसी अ संघाचा 5 गडय़ानी तर अर्जुन स्पोर्ट्स युनियन जिमखाना संघाने विजया क्रिकेट अकादमीचा 5 गडय़ानी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. आदी नलवडे (अर्जुन स्पोर्ट्स), अभिनव चव्हाण (बेळगाव स्पोर्ट्स क्लब) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

पहिल्या सामन्यात एमसीसीसी ए संघाने 19 षटकात सर्व बाद 52 धावा केल्या. मोहित सय्यदने  15 धावा केल्या. बीएससीतर्फे तेजस कडाडीने 8 धावात 3, अभिनव चव्हाणने 13 धावात 3, लाभा वेर्णेकरने 11 धावात 2 तर सोहम पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने 7.3 षटकात 5 बाद 53 धावा करून सामना 5 गडय़ानी जिंकला. निवॉल डिसोझाने 24 धावा केल्या. एमसीसीतर्फे मोहित सय्यदने 19 धावात 3, अब्दुल शेखने 1 बळी टिपला.

Advertisements

दुसऱया सामन्यात विजया अकादमीने 24.5 षटकात सर्व बाद 91 धावा केल्या.  श्वेत भाटीने 13, स्वयम विद्याबालकरने 17, चरनजीत गौडरने 12 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे आदी नलवडेने 20 धावात 4, शुभम खोतने 13 धावात 2, स्वरूप साळुंखे व राजदीप मोटारने प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल अर्जुन स्पोर्ट्सने 18.4 षटकात 5 बाद 92 धावा करून सामना 5 गडय़ानी जिंकला. गौरव पाटीलने 36, आदी नलवडेने 23, साईराज साळुंखेने 13 धावा केल्या. विजयातर्फे धृवांक पाटीलने 11 धावात 2, श्वेत भाटी, शशी शिरोडकर, हमजा सराफ यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Related Stories

स्मार्ट सिटीच्या कामासाठी फुटलेल्या पाईपचा वापर

Amit Kulkarni

राज्यस्तरीय टेटे स्पर्धेत सान्वी, आयुषी, तनिष्का विजेते

Amit Kulkarni

गणेशोत्सवाची मार्गसूची तातडीने जाहीर करा

Amit Kulkarni

कचरा डेपोविरोधात बेनकनहळ्ळी ग्रामस्थांचा मोर्चा

Amit Kulkarni

रुग्णवाहिका उपलब्ध होत नाल्याने रुग्णांचे हाल; आपत्कालीन वाहनांचे भाडे निश्चित नाही

Abhijeet Shinde

तलावात बुडून अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!