तरुण भारत

मराठी आवाज दिल्लीत पोहोचविण्याचा निर्धार

शुभम शेळके यांना बेळगुंदी, गणेशपूर, बेनकनहळ्ळी येथे भरघोस प्रतिसाद

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना येत्या लोकसभा पोटनिवडणुकीत मोठय़ा मताधिक्क्मयाने निवडून देऊन मराठी आवाज दिल्लीत पोहोचविण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. मंगळवारी गणेशपूर, विजयनगर, बेनकनहळ्ळी, बेळगुंदी, सोनोली, राकसकोप या मराठीबहुल भागात शुभम शेळके यांनी जोरदार प्रचार केला. मराठी भाषिकांवर होणाऱया अन्यायाची चिड या लोकसभा निवडणुकीतून दाखवून देऊ, असा विश्वास मतदार शेळके यांना देत आहेत.

लोकसभा पोटनिवडणुकीत युवकाला संधी दिल्यामुळे संपूर्ण सीमाभागात नवचैतन्य पसरले आहे. राष्ट्रीय पक्षातील तरुणही आता म. ए. समितीच्या भगव्याखाली एकत्रित येत आहेत. मराठी भाषिकांचे आराध्यदैवत असणाऱया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीबाबत अनेकवेळा राजकारण झाले. परंतु यावेळी राष्ट्रीय पक्षातील एकाही नेत्याने तोंडातून ब्र देखील काढला नाही. आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर महाराजांच्या नावे मतांचा जोगवा मागत आहेत.
परंतु मराठी भाषिक अशांना थारा देणार नाहीत. मराठी भाषिक भगव्याच्या सन्मानार्थ म. ए. समितीला मतदान करतील, असा विश्वास शुभम शेळके यांनी बेनकनहळ्ळी येथे झालेल्या प्रचारफेरीत व्यक्त केला.

बिदर-भालकीच्या कार्यकर्त्यांकडून सत्कार म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळू लागला आहे. बिदर-भालकी सीमाभागातील म. ए. समिती तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांनी शुभम शेळके यांचा बेळगावमध्ये येऊन सत्कार केला. यावेळी दिनेश मुदाळे, शशिकांत नेलवाडे, राम वाघमारे, हर्षवर्धन पाटील तसेच इतर कार्यकर्त्यांनी शेळके यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.  

Related Stories

चव्हाण, ग्रामीण, एसआरएस, आरोही, एसजी स्पोर्ट्स विजयी

Amit Kulkarni

कोरोनामुळे शेतकरी अडचणीत, तातडीने समस्या सोडवा

Patil_p

सीमाप्रश्नासाठी उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा

Patil_p

कोरोना काळात वाढले रक्तदानाचे महत्त्व

Amit Kulkarni

ग्रामीण भागात अघोषित वीजकपात

Amit Kulkarni

आमदार अनिल बेनकेंकडून विविध विकासकामांना चालना

Patil_p
error: Content is protected !!