तरुण भारत

बसवण कुडची यात्रेनिमित्त इंगळय़ांचा कार्यक्रम

वार्ताहर / सांबरा

बसवण कुडची येथे श्री कलमेश्वर, श्री बसवाण्णा व श्री ब्रह्मदेव यात्रेनिमित्त मंगळवारी इंगळय़ांचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. सायंकाळी मंदिरात विधिवत पूजन झाल्यानंतर इंगळय़ांचा कार्यक्रम झाला.

Advertisements

 दरवर्षी या कार्यक्रमाला परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा गाव मर्यादित करण्याचे ठरविण्यात आले होते. तरी देखील भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. भाविकांच्या गर्दीमुळे मुख्य रस्त्यावर रहदारी खोळंबली होती. वाहतूक सुरळीत होण्यासाठी बराच उशीर लागला. रात्री उशिरापर्यंत गावात भाविकांची गर्दी होती. बुधवारी आणि गुरुवारी खळय़ांच्या कुस्त्या होणार आहेत.

Related Stories

बाळासाहेब पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार

Patil_p

पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणी

Omkar B

खानापूर तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अडचणीत

Patil_p

पोस्ट कर्मचाऱयांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

Patil_p

जुगार खेळणाऱया 9 जुगाऱयांना अटक

Patil_p

भारताची फिडे ऑनलाईन ऑलिम्पियाड फायनलमध्ये धडक

Patil_p
error: Content is protected !!