तरुण भारत

जुने बेळगाव येथे कलमेश्वर यात्रा साध्या पद्धतीने

प्रतिनिधी / बेळगाव

जुने बेळगाव येथील कलमेश्वर यात्रा सोमवार व मंगळवारी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सोमवारी रात्री पारंपरिक पद्धतीने आंबिल गाडे काढण्यात आले. यावषी कोरोनामुळे मानाचा एकच गाडा गावामध्ये फिरविण्यात आला.

Advertisements

मंगळवारी सायंकाळी इंगळय़ांचा विधी व गाऱहाणे घालण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख मानकऱयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावषी कोरोनामुळे सरकारी निर्बंधाप्रमाणे यात्रा साजरी करण्यात आली. कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने यात्रा संपन्न झाली. यावेळी कलमेश्वर जीर्णोद्धार ट्रस्ट कमिटीचे चेअरमन देविदास खन्नुकर, सेपेटरी नारायण खन्नुकर, खजिनदार मलसर्ज पाटील, सभासद यल्लाप्पा देसूरकर, अशोक कणबरकर, परशराम पाटील, लक्ष्मण रावजीचे, रतुष पाटील, गजानन एकणेकर, सतीश खन्नुकर, मोहन खन्नुकर, चंद्रकांत शिनोळकर यांच्यासह इतर सदस्य व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

मराठी भाषिकांचा आत्मविश्वास वाढला

Amit Kulkarni

हिंडलगा कारागृहातील कच्च्या कैद्याचा मृत्यू

Patil_p

रोटरीतर्फे पोलिसांसाठी एक हजार मास्क

Amit Kulkarni

महाराष्ट्र सरकारकडून येळ्ळूर मराठी मॉडेलला लवकरच निधी

Patil_p

कागवाड येथे भाजप ओबीसी मोर्चातर्फे कृषी-सुशासन दिनाचे आचरण

Rohan_P

रस्ते मोकळे करा, अन्यथा कारवाई

Rohan_P
error: Content is protected !!