तरुण भारत

नवा उच्चांक! 24 तासात 1.15 लाख बाधितांची नोंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात कोरोनाकाळातील नवा दैनंदिन उच्चांक नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संकट आणखी गडद होत असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वी 5 एप्रिलला देशात पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत विक्रमी रुग्णवाढ नोंदवण्यात आली होती. तर पहिल्या लाटेत 17 सप्टेंबरला 97 हजार 894 ही बाधितांची सर्वाधिक आकडेवारी होती. दरम्यान, देशात मागील 24 तासात 1 लाख 15 हजार 736 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 630 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 28 लाख 01 हजार 785 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 66 हजार 177 एवढी आहे. 

मंगळवारी 59,856 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 92 हजार 135 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 8 लाख 43 हजार 473 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 8 कोटी 70 लाख 77 हजार 474 जणांना लसीकरण करण्यात आले. 

देशात आतापर्यंत 25 कोटी 14 लाख 39 हजार 598 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 12 लाख 08 हजार 329 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.06) करण्यात आल्या.

Related Stories

खेळणी उत्पादनातही ‘आत्मनिर्भर’तेची गरज

Amit Kulkarni

ताजमहालमध्ये बाँम्ब ठेवल्याची खोटी धमकी, आरोपी ताब्यात

Amit Kulkarni

बिगरशिख संस्थेकडे कर्तारपूर साहिबची जबाबदारी

Patil_p

कोरोना : चीनमधून आणखी 323 भारतीयांना विमानाने आणले

prashant_c

भाजीविक्रेत्याचा मुलगा 10 वीत पहिला

Patil_p

पंतप्रधानांसह खासदारांच्या वेतनात तीस टक्के कपात

prashant_c
error: Content is protected !!