तरुण भारत

बेळवट्टी येथे ट्रक अपघातात युवक ठार

अपघातानंतर ट्रक चालकाचे पलायन : वडगाव ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद

वार्ताहर / किणये

बेळवट्टी रस्त्यावर ट्रक उलटून एकजण जागीच ठार झाला आहे. तर ट्रक चालकाने पलायन केले. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. अपघाताची माहिती बेळवट्टी ग्रामस्थांनी वडगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

सदर घटनेची नोंद रात्री उशीरा वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. शंकर मलिनाथ जाधव (वय 29) रा. न्यू वंटमुरी असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ट्रक हा म्हाळुंगे साखर कारखान्याकडे जाणार होता. मात्र चालक रस्ता चुकल्याने बोकनूर गावी गेला होता. परत बेळवट्टी गावाहून बेळगुंदीमार्गे तो ट्रक  म्हाळुंगे साखर कारखान्याला जाणार होता.

बेळवट्टी रस्त्यावर गावानजीक आल्यानंतर वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या मध्यभागी ट्रक कलंडला. यात क्लिनर जागीच ठार झाला तर ट्रक चालकाने तेथून पलायन केले. भर रस्त्यावर ट्रक कलंडल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. बेळवट्टी गावातील काही प्रमुख मंडळींनी याबाबत वडगाव ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली.

Related Stories

ऐन भात कापणीच्यावेळी पाऊस पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

Patil_p

नवी गल्ली, शहापूर येथे शिवजयंती

Patil_p

गोजगे येथील शेतकऱयाची आत्महत्या

Patil_p

अंत्यविधीच्या लाकडालाही भ्रष्टाचाराची कीड

Patil_p

दारू दुकाने आजपासून उघडणार

Patil_p

कक्केरीतील ‘त्या’ खुनामागे सासऱयाचाच हात असल्याचे उघडकीस

Patil_p
error: Content is protected !!