तरुण भारत

लाभ गलिसरिनेचे

कडक उन्हाळा सुरू झाल्यावर त्वचेवरही दुष्परिणाम होत असतो. उन्हाळ्यातही त्वचा कोरडी पडू लागली आहे. त्वचा कोरडी पडल्यावर त्वचेचं सगळं सौंदर्य लोप पावतं. उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा कोरडी पडू लागते. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी पाण्याचं तसंच द्रव पदार्थांचं प्रमाण वाढवायला हवं. यासोबतच ग्लिसरिनचा वापर करूनही त्वचेचं सौंदर्य खुलवता येईल.

  • ग्लिसरिन त्वचेसाठी खूपच लाभदायी आहे. ग्लिसरिनमुळे त्वचा मुलायम आणि नितळ दिसू लागते. तसंच त्वचेवरील डागही दूर होऊ लागतात. ग्लिसरिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या तसंच फाईन लाईन्सही कमी होतात.
  • ग्लिसरिन त्वचेचा कोरडेपणा कमी करण्याचं काम करतं. उन्हाळ्यात गुलाबपाणी मिश्रित ग्लिसरिन लावल्यास अधिक लाभ होतात. चेहरा मुलायम आणि नितळ दिसू लागतो.
  • ग्लिसरिनचा वापर  मॉईश्चरायझरप्रमाणे करता येऊ शकतो. दररोज ग्लिसरिन वापरल्यास त्वचा टवटवीत आणि ताजीतवानी दिसते. चेहर्यावर चट्टे पडले असल्यास ग्लिसरिन लावायला हवं.  ग्लिसरिनमुळे उन्हापासून त्चचेचा बचाव होतो. त्वचा काळी पडत नाही तसंच रापतही नाही.
  • तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी ग्लिसरिनचा वापर क्लिंजरप्रमाणे करायला हवा.
  • ग्लिसरिनचा वापर करून स्क्रबही तयार करता येईल. दोन चमचे साखर, दोन चमचे ग्लिसरिन, चिमूटभर मीठ, एक चमचा लिंबाचा रस असं साहित्य घ्या. हे सगळे घटक नीट एकत्र करा. हे मिश्रण चेहर्याला लावून स्क्रबिंग करा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

Related Stories

सोशल मीडिया आणि नातेसमंध

Amit Kulkarni

अतिव्यायाम ठरतो घातक

Omkar B

थकवा दूर करण्यासाठी…

Omkar B

इच्छाशक्तीचा बळावर

Amit Kulkarni

फसवणूक झाली आहे.

Omkar B

बीटाने उजळवा त्वचा

Omkar B
error: Content is protected !!