तरुण भारत

शरद पवारांनी कोरोना लसीचा घेतला दुसरा डोस ; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

मुंबई / ऑनलाईन टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. पवार यांना घरीच कोरोनाची लस देण्यात आली. शरद पवार यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसंच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे आभार मानले.

योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. यानिमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहनही शरद पवार यांनी ट्वविटच्या माध्यमातून केलं आहे.

देशभरात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून सुरुवात झाली. या तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्याच दिवशी दुपारी शरद पवार यांनी कोरोना लसीचा पहिला डोस टोचून घेतला होता. त्यानंतर ३० मार्चला शरद पवार यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आणि ३ एप्रिलला म्हणजेच तीन दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज दिल्यानंतर आज शरद पवारांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Related Stories

मुंडेविरुध्द दुसर्या पत्नीचीही तक्रार

triratna

साताऱयात फ्लॅट फोडून लाखोंचे दागिने लंपास

Patil_p

पुणे : कोरोनामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणूक नाही

pradnya p

‘निसर्ग’ चक्रीवादळ दुपारी अलिबाग किनाऱ्याजवळ धडकणार

datta jadhav

‘पॅनिक बुकिंग’ टाळावे : आयओसी

tarunbharat

सोलापूर ग्रामीणमध्ये आज १३७ बाधितांची भर,6 जणांचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!