तरुण भारत

उत्तराखंड : 791 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

ऑनलाईन टीम / देहरादून :


उत्तराखंडात मागील 24 तासात 791 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 07 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 1 लाख 03 हजार 602 इतकी आहे. सद्य स्थितीत 3,607 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Advertisements


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 48,072 नमुने निगेटिव्ह आले. तर देहरादूनमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 303 नवे रुग्ण आढळून आले. अल्मोडा 6, बागेश्वर 11, चमोली 3, चंपावत 2, हरिद्वार 185, नैनिताल 107, पौडी गडवाल 1, पिथौरागड 45, रुद्रप्रयाग 5, टिहरी 75, उधमसिंह नगर 41 आणि उत्तरकाशीमध्ये 7 नव्या रुग्णांची भर पडली. 


दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1736 ( 1.68 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 351 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 96,647 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Related Stories

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन? केजरीवाल सरकारचा केंद्र सरकारला प्रस्ताव

pradnya p

कोरोनाचा प्रसार वाढताना लॉकडाऊन हटवला जातोय

Patil_p

हिमाचल : कार दरीत कोसळून तीन जणांचा मृत्यू

pradnya p

दक्षिण भारतातील प्रसिद्ध ब्रह्मोत्सवास प्रारंभ

Patil_p

दिल्लीत 5,891 नवे कोरोना रुग्ण; 47 मृत्यू

pradnya p

गुरुवारी राज्यभरात ‘मास्क डे’

Patil_p
error: Content is protected !!