तरुण भारत

कोल्हापूर : अरुण नरके यांची गोकुळच्या मैदानातून माघार

स्निग्धा नरके यांनीही घेतली माघार

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या पंचवार्षिक निवडणुकीतून माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी बुधवारी उमेदवारी मागे घेतली सुन स्निग्धा चेतन नरके यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या माघारीमुळे चेतन नरके यांची सत्तारुढ आघाडीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर २० एप्रिल पर्यंत माघारीची मुदत देण्यात आली आहे. गेली दोन दिवसात एक ही माघार झालेली नव्हती. बुधवारी सकाळी सत्तारूढ आघाडीचे नेते अरुण नरके आणि त्यांची सुन स्निग्धा यांनी उमेदवारी मागे घेतली.

दरम्यान, निवडणूक लागण्यापूर्वीच नरके यांनी निवृत्ती जाहीर केली होती. आपल्या जागी मुलगा चेतन यांची उमेदवारी घोषित केली होती परंतु, ऐनवेळी चार संचालकांनी सत्ताधारी आघाडीला सोडचिठ्ठी दिल्याने अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी अरुण नरके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे चेतन नरके यांच्या उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली होती मात्र, आता नरकेंनी माघार घेतल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Related Stories

वाईन शॉप मध्ये ही प्रवेश थर्मल टेस्टींगनेच

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गिजवणे जवळ अपघातात एक जखमी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : `झूम’वरील वीजनिर्मिती प्रकल्प बंद

Abhijeet Shinde

लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना लुटणाऱ्या दोन कृषी केंद्रांवर कारवाई

Abhijeet Shinde

खाटांगळे निवडणूक बिनविरोध; ग्रामस्थांचे ग्रामदैवत मंदिर बांधकामाला प्राधान्य

Abhijeet Shinde

आरळे येथे तरुणाला अज्ञातांकडून बेदम मारहाण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!