नवी दिल्ली
स्मार्टफोन्स प्रकारात लोकप्रियता मिळवणाऱया रियलमीने आपले तीन नवे स्मार्टफोन तेही बजेटमध्ये सादर करण्याची योजना आखली असून सदरचे फोन्स गुरूवार 8 एप्रिलला दाखल केले जाणार आहेत, असे समजते. सी 25, सी 21 आणि सी 20 हे दमदार बॅटरीसहचे फोन्स लाँच होणार आहेत. यातील एका फोनची बॅटरी 6000 एमएएच क्षमतेची तर दोन फोन्स 5 हजार एमएएच क्षमतेसह येणार आहेत. सी 25 फोनला 48 मेगापिक्सल ट्रीपल कॅमेरा, सी 21 फोन 13 मेगापिक्सल तर सी 20 फोनला 8 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे. सदरचे फोन हे परवडणाऱया किंमतीत असणार असून किंमती मात्र जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. हे फोन आशियाई देशांसह मलेशिया, इंडोनेशियात दाखल झालेले आहेत. जुन्या सी सिरीजचे फोन भारतात मागच्या वर्षी सादर करण्यात आले होते. सदरचे नवे स्मार्टफोन 6.5 इंच एचडी प्लस एलसीडी डिस्प्लेसह येणार असून सी 20, सी 21 फोन मीडियाटेक हेलियो जी 35 प्रोसेसर ने युक्त असणार आहेत.