तरुण भारत

टाटा स्टील कंपनीने रचला इतिहास

मुंबई

 टाटा ग्रुपची कंपनी असणाऱया टाटा स्टीलने आपले बाजार भांडवल एक लाख कोटी रुपये केले असून याद्वारे एक नवा इतिहास रचला आहे. यानंतर टाटा स्टीलचा समभाग शेअर बाजारामध्ये 882 रुपयांवर पोहचला होता. हा एक प्रकारचा नवा विक्रमच असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. टाटा स्टीलचे एकूण बाजार भांडवल वाढून 1.05 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मंगळवारी टाटा गुप्रमधील टाटा स्टीलने हा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यात टाटा स्टीलला यश आले आहे. याप्रमाणेच धातू क्षेत्रातील निर्देशांकात मंगळवारी जेएसडब्ल्यू स्टील, सेल, जेएसपीएल आदी कंपन्यांचे समभागही शेअर बाजारात तेजी दर्शवत होते.

Related Stories

प्रवासी वाहन विक्री 14 टक्क्यांनी तेजीत

Patil_p

रिलायन्सची 200 अब्ज डॉलर्सच्या बाजार मूल्यावर झेप

Patil_p

कोरोना संकटात सॅमसंगला विक्रमी नफा

Patil_p

अशोक लेलँडची व्हीआरएस योजना

Omkar B

जनरल मोटर्सला प्रकल्प विकण्यास होणार विलंब?

Patil_p

हॉलमार्कविना दागिने विकण्यासाठी मिळाला वाढीव कालावधी

Patil_p
error: Content is protected !!