तरुण भारत

किरण ठाकूर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

-लोकमान्यतर्फे बालसंकुल व मातोश्री वृध्दाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑफ. सोसायटी लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष, `तरूण भारत’चे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. लोकमान्यच्यावतीने  बालसंकुल व मातोश्री वृध्दाश्रमात रिजनल मॅनेजर दिलीप पाटील यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोकमान्यच्या सामाजिक उपक्रमाबद्दल बालसंकुल व वृध्दाश्रमाच्या वतीने समाधान व्यक्त केले. 

रिजनल मॅनेजर पाटील म्हणाले, किरण ठाकुर यांच्या कल्पक नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लोकमान्य सोसायटीने सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि दिल्लीतही लौकिक संपादन केला आहे. 217 शाखा असून 5 हजार कोटीच्या ठेवी आहेत. कोल्हापूर विभागातर्गंत 23 शाखा असून 325 कोटीच्या ठेवी आहेत. लोकमान्यने बँकिंग, विमा क्षेत्रात सेवा देताना सामाजिक बांधिलकी  जपली आहे. शेकडो लोकांना स्वयंरोजगार देवून आत्मनिर्भर बनविले आहे. दर्जेदार सेवेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.  सुरक्षितता, विश्वासार्हता, सर्वोत्तम परतावा, पारदर्शकतेच्या जोरावर ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतकांचा विश्वास जिंकला आहे. ठेवी गोळा करून कर्जवाटप करणे इतकेच मर्यादीत उद्दीष्ट न ठेवता रियल इस्टेट, हॉस्पिटलीटी, विमा उत्पादने विक्री, परकीय चलन, लॉकर्सच्या सुविधा, शिक्षण, टूरिझम, प्रुझ आदी सेवा लोकमान्य देत आहे. 

तरूण भारत कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक मनोज साळुंखे म्हणाले, `तरूण भारत’चे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी समाजसेवेचे व्रत घेतले आहे. स्वातंत्र्यपुर्व काळापासून तरूण भारतने वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजसेवेचे मोलाचे कार्य केले आहे. फार मोठी परंपरा असणाऱया या वृत्तपत्राने शतकाहून अधिक काळ समाजसेवेचे कार्य केले आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून जवळपास 8 हजारहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वृध्दाश्रम ही समाजाची गरज आहे. मातोश्री वृध्दाश्रमात वृध्दांची योग्य प्रकारे सेवा केली जाते. म्हणूनच आज येथील आजी-अजोबा आनंदी असून वृध्दाश्रमाला आपलेच घर मानत आहेत. लोकमान्य रिजनल ऑफिसचे असिस्टंट रिजनल मॅनेजर आर. डी. पाटील म्हणाले, लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी अनेक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सीमा भागातील मराठी माणसाला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मातोश्री वृध्दाश्रम नसून हे नंदनवन आहे. यावेळी  मार्केटींग ऑफिसर ऋतुराज दळवी, अवधुत जांभळेकर, सदानंद भोसले, बालसंकुलच्या सचिव पद्मजा तिवले, टी. एम. कदम, स्मिता वायचळे, आदी उपस्थित होते.

लोकमान्यची वाटचाल कौतुकास्पद

संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्यची सुरू असलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने बालसंकुलला जीवनावश्यक वस्तू देऊन लोकमान्य कृतिशील सामाजिक बांधलकी जपली आहे. संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना ही मदत मोलाची ठरणार आहे.

पी. के. ढवरे (बालसंकुल)

किरण ठाकुर यांनी हजारो लोकांना रोजगार दिला

संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांचा आणि त्यांच्या मातोश्रींचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. त्यांनी आपल्या वडीलांचे विचार पुढे नेत सर्वच क्षेत्रात गगणभरारी घेतली आहे. हजारो लोकांना रोजगार दिला आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

वैशाली राजशेखर(उपाध्यक्षा, मातोश्री वृध्दाश्रम, चंबुखडी)

वटवृक्षाचा विस्तार व्हावा

लोकमान्यचे संस्थापक, अध्यक्ष किरण ठाकूर यांनी वृत्तपत्र, सहकार, शिक्षण, टूरिझम, हॉटेल, प्रुझ आदी क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे. महिलांच्या सबलीकरणाला त्यांनी स्थान दिले आहे. त्यांच्या हाताखाली हजारो लोक तयार झाले आहेत. त्यांचा कार्याचा जो वटवृक्ष लोकमान्य आणि तरूण भारतच्या रूपाने उभा आहे, त्या वटवृक्षाचा विस्तार व्हावा.

  सूर्यप्रभा चिटणीस (अध्यक्ष, मातोश्री वृध्दाश्रम, चंबुखडी)

Related Stories

कुंभोज दानोळी रोडवर बिबट्याचे दर्शन कुंभोज नागरिकांत भीतीचे वातावरण

Abhijeet Shinde

इचलकरंजीत कोले मळा परिसर सील

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात ‘कोरोना’चे ६ बळी, १६६ नवे पॉझिटिव्ह रूग्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाने 11 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कुंभोज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत जातपडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!