तरुण भारत

तृणमूल अन् डाव्यांकडून भाजपवर आरोप

1 हजार रुपयांचे कुपन वाटल्याचा दावा

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान आता कूपन वाद सुरू झाला आहे. मंगळवारी झालेल्या तिसऱया टप्प्यातील मतदानानंतर तृणमूल आणि डाव्यांनी लोकांचे समर्थन खरेदी करण्यासाठी भाजप 1 हजार रुपयांचे कूपन वाटत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तिसऱया टप्प्यातील 31 मतदारसंघांमधील मतदानादरम्यान तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट, दगडफेक आणि उमेदवारांवर हल्ले अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.

तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्विट करत या कूपनबद्दल सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कूपनद्वारे घराघरात पोहोचत आहेत. निवडणूक आयोगा याप्रकरणी कारवाई करावी असे त्यांनी म्हटले आहे. भाजप एक हजार रुपयांच्या कूपनद्वारे लोकांना आकर्षित करत आहे. 1 एप्रिल रोजी ज्योतिनगर येथे झालेल्या मोदींच्या सभेत सामील होण्यासाठी ही  रक्कम देण्यात आली आहे. याचबरोबर भाजपला मतदान करण्यासाठी हे कूपन्स वाटण्यात आल्याचा दावा तृणमूल आणि डाव्या पक्षांनी केला आहे.

कूपन नव्हे तर देणगीची पावती

दक्षिण 24 परगण्यातील रायदीघीमध्ये भाजप समर्थकांच्या हातात कूपन दिसून आले आहेत. यात एक हजार रुपयांचा उल्लेख असून मोदींचे छायाचित्र आहे. हे कूपन नसून समर्थकांनी दिलेल्या देणगीची पावती आहे. ज्योतिनगर येथे सभा आयोजित करण्यासाठी देणगी जमविण्यात आली होती असे भाजपने म्हटले आहे.

उमेदवाराची उलटसुलट विधाने

रायदीघीचे भाजप आमदार शांतनू बापूली यांनी वेगवेगळी विधान केली आहेत.  रोख रक्कम प्राप्त करता येण्यासारखी कुठलीच कुपन्स नाहीत असे त्यांनी पूवीं म्हटले होते. या कुपन्सद्वारे मोदींच्या सभेत येणाऱयांच्या वाहतुकीचा खर्च करण्यात आल्याचे बापूली यांनी सांगितले आहे.

डाव्या नेत्याचा दौरा माकप उमेदवार कांति गांगुली रायदीघी येथे पोहोचल्या असता त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही कुपन्स दाखविली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनाही अशी कुपन्स मिळाली आहेत. या कुपन्समध्ये मोदी आणि एक हजार रुपयांचा उल्लेख असल्याचे कार्यकर्त्यांनी गांगुली यांना सांगितले आहे.

Related Stories

हिमाचल प्रदेश : खाजगी कंपन्यांनाही कोरोना टेस्ट करण्यास परवानगी

pradnya p

जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा

pradnya p

कोरोना : दिल्लीत रुग्णांनी ओलांडला 6.33 लाखांचा टप्पा

pradnya p

2 अपघातात 14 जणांचा मृत्यू

pradnya p

प्रशांत भूषण प्रकरणी निर्णय राखून

Patil_p

नियंत्रण रेषेवरील तैनात जवानांना मिळणार अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स

datta jadhav
error: Content is protected !!