कोरोनामुळे मर्यादित लोकांनाच मिळतोय प्रवेश
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील 55 एकरमध्ये फैलावलेल्या कार्ल्सबॅडचे खोरे 7 कोटी फुलांनी बहरले आहे. येथे रेननकुलसच्या विविध प्रजातींची फुले फुलली आहेत. लोकांना खोऱयाचे सौंदर्य न्याहाळता यावे करता ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पण मर्यादित पर्यटकांनाच प्रवेश दिला जात आहे. लोकांना सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले जात आहे.


यंदा निर्बंधासह खोरे खुले झाल्यावर लोकांनी येथे पोहोचण्यास प्रारंभ केला आहे. याचबरोबर पर्यटकांची सैर घडविणाऱया ट्रक्टर ट्रॉलीवर प्लास्टिकने पार्टिशन करण्यात आले आहे, जेणेकरून लोकांदरम्यान अंतर राखता येईल. अमेरिकेत सर्वाधिक रेननकुलसची फुले याच खोऱयात फुलत असतात. 2019 मध्ये या फुलांच्या आविष्काराला पाहण्यासाठी 7.5 लाख लोक पोहोचले होते. तर 2020 मध्ये महामारीमुळे खोरे लोकांसाठी बंद करण्यात आले हेते.