तरुण भारत

भर आकाशात अचानक थांबले विमान

परग्रहवासीयांचा हात, सीआयएच्या माजी संचालकांचा दावा

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी संचालक जेम्स वूलसे यांनी परग्रहवासीयांच्या (एलियन्स) अस्तित्वाबद्दल एक मोठा दावा केल आहे. पूर्वी मी देखील एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल साशंक होतो, पण 40 हजार फुटांच्या उंचीवर एक विमान अचानक थांबल्याने मला माझा विचार बदलावा लागला. एलियन्स अस्तित्वात असल्यास आम्ही त्यांच्याशी मैत्री करू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. जेम्स हे 1993-1995 या कालावधीत सीआयएचे प्रमुख होते. 

ऑपरेशन ड्रगन या स्वतःच्या नव्या पुस्तकाबद्दल त्यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे. मागील अनेक वर्षांमध्ये आकाशातील अनेक गूढ गोष्टींमध्ये ऐकले आहे. माझ्या मित्राचे विमान 40 हजार फुटांच्या उंचीवर अचानक थांबले होते आणि एका सामान्य विमानाप्रमाणे उड्डाण करू शकत नव्हते. हा प्रकार नेमका कसा घडला हे मला ज्ञात नाही असे जेम्स म्हणाले. इस्रायलच्या अंतराळ सुरक्षा कार्यक्रमाचे माजी प्रमुख हॅम इशेद यांनी ब्रह्मांडात एलियन्स असून त्यांचा अमेरिका सतेच इस्रायलसोबत संपर्क असल्याचा दावा केला होता.

माणूस अद्याप त्यांच्याकरता तयार नसल्यानेच परग्रहवासीयांच्या अस्तित्वाचे सत्य लपवून ठेवण्यात आले आहे. एक ‘गॅलेक्टिक फेडरेशन’ तयार करण्यात आले असून ते अमेरिकेसोबत गुप्त कराराच्या अंतर्गत मंगळ ग्रहावर जमिनीच्या आत एक तळ चालवत असल्याचा दावाही इशेद यांनी केला होता.

Related Stories

आयोडीनच्या सौम्य द्रावणाने कोरोना विषाणूचा नाश; शास्त्रज्ञांचा दावा

datta jadhav

डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार बाधित

Patil_p

खनिज तेल उत्पादनात होणार कपात

prashant_c

इटलीत संक्रमण वाढले

Omkar B

निर्बध शिथिल

Patil_p

अरुणाचल प्रदेशजवळ चीनची धरणनिर्मिती

Patil_p
error: Content is protected !!