तरुण भारत

एका चित्रपटासाठी उर्वशीने घेतले 10 कोटी

तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये स्वतःच्या घायाळ अदांनी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.  उर्वशी लवकरच दक्षिणेच्या बिग बजेट चित्रपटात मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एका आयआयटीयनच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

उर्वशी अलिकडेच मनालीमऋये दिग्गज अभिनेता सरवनन याच्यासोबत चित्रिकरण करताना दिसून आली होती. उर्वशीने या मेगाबजेट चित्रपटासाठी 10 कोटी रुपये आकारले आहेत. दीपिका पदूकोन आणि प्रियांका चोप्रानंतर उर्वशी सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. तर तमिळसोबत उर्वशी ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटाद्वारे तेलगूतही पदार्पण करणार आहे.

उर्वशी सध्या स्वतःच्या आगामी चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. इन्स्पेक्टर अविनाश ही वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर इजिप्तिशियन अभिनेता आणि गायक मोहम्मद रमदानसोबत उर्वशी एका म्युझिक अल्बमध्ये दिसून येणार आहे.

Related Stories

कंगना अडचणीत; कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश

pradnya p

सुशांत आत्महत्या : बिहार सरकारकडून CBI चौकशीची शिफारस

pradnya p

2021 मध्ये दयाबेनची शोमध्ये ‘एंट्री’

Patil_p

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेने पूर्ण केले 100 भाग

Patil_p

मी नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या शोधात असतो – सागर कारंडे

Patil_p

चित्रपट अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे कर्करोगाने अमेरिकेत निधन

triratna
error: Content is protected !!