तरुण भारत

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत किम कार्दशियन

अमेरिकन मॉडेल आणि बिझनेसवुमन किम कार्दशियनचे केवळ चाहतेच कोटय़वधींच्या संख्येत नसून ती आता अब्जावधींच्या मालमत्तेची मालकीणही झाली आहे. फोर्ब्सच्या अहवालुनसार किम आता अधिकृतपणे बिलिनियर (अब्जाधीश) झाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये तिची एकूण मालमत्ता 780 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. ज्यात यंदा प्रचंड वाढ झाली असून तिची मालमत्ता आता बिलियन्समध्ये पोहोचली आहे.

टीव्ही शोज, जाहिरात करारांसह किमचे दोन मोठे व्यवसाय आहेत. किमचे सोशल मीडियावर कोटय़वधी फॉलोअर्स आहेत. अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल किमप्रमाणे दिसू पाहणाऱया जगात अनेक महिला आहेत. याकरता काही महिला प्रचंड पैसा खर्च करतात.

किमने 2017 मध्ये स्वतःचा कॉस्मेटिक व्यवसाय केकेडब्ल्यू ब्युटीने सुरू केला होता. पहिल्याच दिवशी तीन लाख कंटोर किट्स विकले गेले होते. 2019 मध्ये तिने शेपवियर प्रॉडक्ट्स बिझनेस स्किम्स सादर केला होता.

Related Stories

भारतीय महिला संयुक्त राष्ट्र महासचिवपदाच्या शर्यतीत

Patil_p

धार्मिक कट्टरतेने घेतला शिक्षकाचा बळी

Patil_p

नेदरलँड्स टाळेबंदीत वाढ

Patil_p

श्वानासाठी राष्ट्रीय सुटी देणारा देश

Patil_p

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे भारताला अशक्य

datta jadhav

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 90 हजारांवर

datta jadhav
error: Content is protected !!