तरुण भारत

नवे बाधित उच्चांकी पातळीवर

दिवसभरात 1 लाख 15 हजार नवे रुग्ण ः सक्रिय रुग्णसंख्या साडेआठ लाखांवर

बेळगाव

देशातील कोरोनाची स्थिती? 

एकूण रुग्ण ः 1 कोटी 28 लाख 1 हजार 785

एकूण डिस्चार्ज ः 1 कोटी 17 लाख 92 हजार 135

एकूण सक्रिय रुग्ण ः 8 लाख 43 हजार 473

एकूण मृत्यू ः 1 लाख 66 हजार 177

लसीकरण ः 8 कोटी 70 लाख 77 हजार 474

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात बुधवारी दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 1 लाख 15 हजार 736 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 8 लाख 43 हजार 473 वर पोहोचल्याने उपचाराधीन रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी 55 हजार रुग्णांची नोंद झाली असून दिल्लीत 5 हजार 100 नवे रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

देशातील रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 28 लाख 1 हजार 785 इतकी झाली आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार एका दिवसात 1 लाख 15 हजार रुग्ण सापडले असून यापूर्वी 5 एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ नोंदवण्यात आली होती. गेल्यावषी 17 सप्टेंबरला देशात 97 हजार 894 रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाकाळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यात वेगाने रुग्णवाढ नोंदविण्यात येत असून नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. देशात गेल्या 24 तासात 630 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत 1 लाख 66 हजार 177 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 17 लाख 92 हजार 135 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

भारतात आतापर्यंत 8 कोटी 70 लाख 77 हजार 474 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत देशात 25 कोटी 14 लाख लोकांचे सँपल चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. देशात 1 फेब्रुवारीला 8 हजार 635 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने देशात रुग्ण वाढत चालले आहेत. वाढत्या बाधितांमुळे धास्ती वाढली असून चाचण्या आणि लसीकरण मोहिमेला वेग देण्याची मागणी विविध स्तरातून केली जात आहे.

पंतप्रधानांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद

देशातील कोरोनास्थिती आणि लसीकरण मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात येण्याची शक्मयता आहे. याआधी 17 मार्चला पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोरोनास्थितीचा आढावा घेतला होता. पंतप्रधानांनी रविवारीही उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यात त्यांनी रुग्णवाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला होता.

Related Stories

मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल

pradnya p

मिशन 250 : बंगाली शिकत आहेत शाह

Patil_p

स्टेट बँकेची ठेवींवरील व्याजदरात कपात

Patil_p

दिलासादायक : उत्तराखंडात सात जिल्ह्यात आढळला नाही एकही रुग्ण

pradnya p

देशात 3.81 लाख लोकांना लसीकरण; 580 जणांमध्ये साईड इफेक्ट

datta jadhav

७ महिन्यानंतर सोन्याच्या दरात घसरण

triratna
error: Content is protected !!