तरुण भारत

अविनाश साबळे युगांडात ट्रेनिंग घेणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला स्टीपलचेसपटू अविनाश साबळे युगांडामध्ये ट्रेनिंग घेणार आहे. 10 एप्रिल ते 20 जुलैपर्यंत त्याचे हे टेनिंग होणार आहे. यासाठीचा प्रस्ताव भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने क्रीडा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यांची मंजुरी मिळाल्याने साबळेचा ट्रेनिंगचा मार्ग मोकळा झाला आहे.

युगांडामध्ये विदेशी प्रशिक्षक ऍडी रूइटर यांच्या मार्गदर्शनाखाली 26 वर्षीय साबळे ट्रेनिंग घेणार आहे. रुइटर यांनी युगांडाचा धावपटू व 5000, 10000 मी. चा विद्यमान विश्वविक्रमधारक जोशुआ चेपतेगेईला मार्गदर्शन केले होते. स्टीपलचेसमध्ये केनिया, युगांडा व मोरोक्को या तीन देशांची मक्तेदारी असल्याचे मानले जाते. 100 दिवसांच्या ट्रेनिंगसाठी एएफआयने आर्थिक साहय़ मिळण्याकरिता केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याच्यासोबत त्याचे प्रशिक्षक अमरिश कुमारही जाणार आहेत. केंद्राने हा प्रस्ताव मान्य केला असून सुमारे 29 लाख रुपये यासाठी मंजूर केले आहेत. साबळेने 3000 मी. स्टीपलचेससाठी ऑक्टोबर 2019 मध्ये दोहातील स्पर्धेत ऑलिम्पिक पात्रता मिळविली होती.

Related Stories

विजय हजारे चषकासाठी मुंबई-उत्तर प्रदेश आमनेसामने

Patil_p

ऑस्ट्रेलिया दौऱयात 5 कसोटी होणे अशक्य

Patil_p

बागानची रियल काश्मीरवर बाजी

Patil_p

लॉकी फर्ग्युसनने केले विजयाचे ‘लॉकिंग’!

Patil_p

नदाल, सित्सिपस, बार्टी, केनिन दुसऱया फेरीत, अझारेंका पराभूत

Patil_p

विश्व युवा बुद्धिबळ : भारताला 3 सुवर्ण, 1 कांस्य

Omkar B
error: Content is protected !!