तरुण भारत

सातारा पालिकेची आज सर्वसाधारण सभा

कर्मचाऱयांची केली कोरोना टेस्ट ऑनलाईन सभेची पुर्वतयारी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेची ऑनलाईन सभा गुरुवार दि. 8 रोजी होत आहे. ही सभा ऑनलाईन होत असल्याने पालिकेने सभेच्या अनुषंगाने तयारी केली आहे. सभेच्या कामकाज पाहणाऱया सर्व कर्मचाऱयांची आर्टिफिशीयल कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र असून ऑनलाईन सभेकरीला नेट प्रॉब्लेम यायला नको म्हणून त्याची तपासणीही करण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्याच्या होणाऱया पालिकेच्या सभेकडे सातारकरांच्या नजरा आहेत.

कोरोना काळात गतवर्षी सभाच झाल्या नव्हत्या. मात्र, प्रशासनाने शेवटपर्यंत ऑफलाईन सभेला परवानगी दिली गेली नव्हती. त्यामुळे पालिकेने फेब्रुवारीपासून ऑनलाईन सभा घेण्यास प्रारंभ केला गेला. आता पुन्हा कोरोनाची लाट आली असून त्या लाटेमध्ये आयोजित केलेली सभा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. त्याकरिता सातारा पालिकेत तयारी करण्यात आली असून नेट कनेक्शन तपासण्यात आले आहे. तसेच सर्व नगरसेवकांना त्यांच्या मोबाईलवर सभेत सहभागी होण्याची लिंकही पाठवण्यात आलेली आहे. जे सभेमध्ये आधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांची आर्टीफिशीयल टेस्ट करण्यात आलेली आहे. सर्व काळजी घेवून ही सभा घेण्यात येणार आहे. मात्र कोणते विषय गाजणार, कोणत्या विषयांना नामंजूरी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

खंबाटकी घाटात वेळेनजीक कारने घेतला पेट

Shankar_P

शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करण्याचे महावितरण कडून आश्वासन

Shankar_P

लवकरच सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Shankar_P

सचिन वाझेंची 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी

pradnya p

ताडी विक्री करणाऱया रॅकेटचा पर्दाफाश

Patil_p

कामेरीत एकजण कोरोना बाधित

Patil_p
error: Content is protected !!