तरुण भारत

मद्यपींची पाऊले परमीटरुम बिअरबारकडे

प्रतिनिधी/ सातारा

ब्रेक द चेननुसार सातारा जिह्यातील सर्व देशी दारुची दुकाने, बिअर शॉपी, वाईन शॉपी बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिली गेली आहेत. त्यानुसार सातारा जिह्यातील केवळ चारशे परमीटरुम बिअरबार सुरु आहेत. तेथेच मद्यपी आपली तलफ भागवण्यासाठी ब्लॅकने दारुची खरेदी करण्यासाठी जात आहेत. मात्र याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून राज्यमंत्री अब्दूल सतार यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.

सातारा शहरासह जिह्यातील केवळ लॉजेसमधील परमीट रुम व बार सुरु आहेत. त्याव्यतिरिक्त दारुची सगळी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मद्यपींची चांगलीच तडफड सुरु आहे. सातारा जिह्यात दुसरा लॉकडाऊन अचानकपणे लागू झाल्याने मद्यपींना साठा करुन ठेवता आला नाही. त्यातच दारुची परमीटरुम बार व्यतिरिक्त सगळी दुकाने बंद आहेत. त्यामध्ये आदेश दिला असला तरीही शटरडाऊन असले तरीही पाठीमागच्या दारातून दारु विक्री सुरु आहे. दरम्यान, चोरटी दारु विक्रीचे प्रमाण वाढले असून या दारु विक्रीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नजरा त्याकडे आहेत. तसेच राज्यमंत्री अब्दूल सतार यांनी दिलेल्या सुचनेनुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.

जिह्यात वाईन शॉपी     106

परमीट रुम बिअरबार   400

वाईन शॉपी                 47

बिअरशॉपी                  62

जो नियम मोडेल त्यावर कारवाई होणार

आमची पथके तयार आहेत. जे दारुचे दुकान नियम मोडेल. तसेच चोरटी दारुची विक्री होताना आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.

अनिल चाकसकर

राज्य उत्पादन शुल्क

Related Stories

सातारा जिल्हा परिषदेचे ‘सर्व्हिसिंग’ सेंटर

datta jadhav

पाणलोटक्षेत्रात उघडीप, जिल्हय़ात संततधार

Patil_p

देशी दारू अड्ड्यावर शाहूवाडी पोलिसांचा छापा

Shankar_P

आदेश आल्याशिवाय एक ही एसटी धावणार नाही: आगार प्रमुख वाकळे

triratna

आर आर आबांचे सुपुत्र व बंधु कोरोना पॉझिटिव्ह

Shankar_P

रस्ता डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात

Patil_p
error: Content is protected !!