तरुण भारत

शासकीय कार्यालयांची गेट बंद

प्रतिनिधी/ सातारा

शासकीय कर्मचाऱयांनी कोरोनाची लस घेतली गेली आहे. दोन्ही डोस काही कर्मचाऱयांनी घेतले आहेत. तरीही कोरोनाच्या अनुषंगाने कार्यालयात नागरिकांना विनाकारण गर्दी होवू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार नागरिकांनाच नो एट्री केलेली आहे. त्यामुळे साताऱयातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये आतुन कामे सुरु असून नागरिकांसाठी मात्र गेट बंद करण्यात आलेली आहेत. जिल्हा परिषदेत तर कडक नियम करण्यात आलेले आहेत. पालिकेत एक दार बंद तर दुसऱया दारात आडवा टेबल लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुध्या नागरिकांना नो एंट्री करण्यात आलेली आहे.

कोरोनाच्या वाढत चाललेल्या प्रार्दूभावामुळे प्रशासनानेच नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लसीचे दोन्ही डोस काही शासकीय कार्यालयातील कर्मचाऱयांनी घेतले आहेत. तर काहींचे दुसऱया टप्यातील लस घेणे बाकी आहे. असे असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात नागरिकांची गर्दी नको म्हणून शासनाच्या निर्देशानुसार कार्यालयामध्ये नागरिकांना मनाई करण्यात आलेली आहे. सातारा शहरातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये फक्त शासकीय कर्मचारी आणि अधिकारी दिसत आहेत. त्यामध्ये प्रत्येक कार्यालयात बाहेरुन कोणाला जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

झेडपीत कडक नियमावली

झेडपीत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कडक नियमावली लागू केली आहे. मार्च एण्ड असल्याने बांधकाम अन् अर्थ विभागात गर्दी दिसत होती. जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील कर्मचारी, अधिकारी हे काळजी घेत आहेत. अगदी बुधवारी शुकशुकाट जाणवत होता. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिहकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह सर्व खाते प्रमुख आपल्या खात्याचा आढावा घेत होते. ऑन लाईन तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तक्रारी येत होत्या.

पालिकेत दाराला लावला टेबल

सातारा पालिकेत सुद्धा अनावश्यक गर्दी करु नये म्हणून एका बाजूचे गेट बंद करण्यात आले आहे. दुसऱया बाजूचे गेटमध्ये दाराला टेबल लावले होते. ज्यांची महत्वाची कामे आहेत. त्यांनाच आतमध्ये सोडले जात होते. काही विभाग तर बंदच होते. पदाधिकाऱयांनीही पालिकेत जाणेच टाळल्याचे दिसत होते. 

Related Stories

महाबळेश्वर पालिकेचे बांधकाम रखडले

Patil_p

सातारा : शेतकऱ्यांनी फसव्या बातम्यांना बळी पडू नये

Shankar_P

सातारा जिल्ह्यात 39 नवे कोरोना रुग्ण, 66 जणांना डिस्चार्ज

Shankar_P

कार्वेचे जवान वैभव थोरात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

Patil_p

सातारा : सामाजिक कार्यकर्त्या सुभद्रा जाधव यांचे निधन

datta jadhav

सातारा : उदयनराजेंनी केला डॉ. शुभांगी गायकवाड यांचा सत्कार

datta jadhav
error: Content is protected !!