वार्ताहर /राजापूर
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मिनी लॉकडाऊनमुळे राजापुरातील व्यापाऱयांनी बुधवारी आपली दुकाने बंद ठेवली असली तरी विरोधाचे फलक झळकावून आपला रोष व्यक्त केला.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला व्यापारीवर्गाचा विरोध आहे. राजापूर तालुका व्यापारी संघटनेच्यावतीने मंगळवारी यासंदर्भात निवेदन देऊन बंदला विरोध दर्शवला होता. या निवेदनामध्ये शनिवार व रविवारच्या लॉकडाऊनला संपूर्णपणे पाठिंबा असेल मात्र संपूर्ण लॉकडाऊनला विरोध राहिल, असे नमूद करण्यात आले आहे. बुधवारी कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱयांनी दुकाने बंद ठेवली, मात्र सांयकाळी व्यापाऱयांनी एकत्र येत बंदला विरोध असल्याचे फलक झळकावले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.