तरुण भारत

राष्ट्रभक्तीची ज्योत जीवनात निर्माण झाल्यास प्रगती : किरण ठाकुर

69 वा वाढदिवस म्हापसा लोकमान्य सोसायटीत सहकार्यांसमवेत साजरा

प्रतिनिधी / म्हापसा

Advertisements

आयुष्यात आपण चांगले केले पाहिजे. तुम्ही हसरा चेहरा ठेवला तर समोरचाही हसतो. त्यामुळे एक जिव्हाळा निर्माण होतो. निरपेक्षवृत्तीने काम केले तर तुमच्या अपेक्षा भंग होत नाहीत. आम्ही लोकमान्यामध्ये 25 वर्षात केलेली कामगिरी घेऊन पुढे जात  आहोत. या सोसायटीचा धडा आर्थिक क्षेत्रात काम करणाऱयांनी घेतला पाहिजे. तुम्ही जे काम करीत आहात ते राष्ट्रप्रेम आहे. राष्ट्रभक्तीचा आमच्याकडे अभाव आहे. ती राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न लोकमान्याच्या रुपाने आम्ही करीत आहोत. पाच मिनिटाची जरी राष्ट्रभक्तीची ज्योत तुमच्या जीवनात निर्माण झाली तर ती आयुष्यभर तुम्हाला पुरेल. तुम्ही देशप्रेमाने काम केल्यास तुमची प्रगती व्हायला उशीर लागणार नाही असे प्रतिपादन लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीचे संस्थापक चेअरमन तरुण भारत समुह प्रमुख व सल्लागार संस्थापक किरण ठाकूर यांनी म्हापसा येथे बोलताना केले.

श्री ठाकूर यांच्या 69 व्या वाढदिनी म्हापसा लोकमान्य कार्यालयात केक कापल्यावर ते बोलत होते. यावेळी उद्योजक व्यवस्थापक सल्लागार- प्रितम बिजलानी, रिजनल व्यवस्थापक कुमार प्रियोळकर, गटप्रमुख एचआर प्रमुख आकाश गांवकर, गटप्रमुख मार्केटिंग प्रमुख- निक्टन डायस, लोकमान्य परिवार मासिकाचे डॉ. गोविंद काळे, अतिथी संपादक, सहाय्यक व्यवस्थापक-अँथोनी आझावेदो, एचआर व्यवस्थापक गायत्री नाईक, ऍडमिन- चंद्रकांत पै, व्यवस्थापक ऍडवायझर – दिलीप कोले, ऑडित मॅनेजर (व्यवस्थापक) सिताराम काळे उपस्थित होते.

निरपेक्षी वृत्तीने काम करा- किरण ठाकूर

यावेळी बोलताना श्री. ठाकूर म्हणाले की, आयुष्यात आपण चांगले केले पाहिजे. तुम्ही हसरा चेहरा ठेवला तर समोरचाही माणूस हसतो आणि त्याच्यामध्ये एक जिव्हाळा निर्माण होतो. आपण एखाद्याला न सांगता सहकार्य केले तर ते आपल्याला त्याचा आनंद मिळतो. निरपेक्षी वृत्तीने काम केले तर तुमच्या अपेक्षा भंग होत नाही पण अपेक्षा धरून काम केले तर तुमच्या अपेक्षा भंग होण्याची शक्यता असते. जास्तीत जास्त लोकांना उपयोगी पडा. ग्राहकांना तुमच्याकडे यावेसे वाटले पाहिजे. चार गोष्टी करायला मिळायला पाहिजे. आज अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये माणसे इंटरोवर्ल्ड होत आहे. आज घरात चार माणसे असली तर ती मोबाईलकडे बोलत आहेत. त्यामुळे पूर्वी टिव्हीने गुंडाळून टाकले होते तसे आज लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत मोबाईलने वेडे करून ठेवले आहे. आज मुले हुषार होत चालली आहेत असे त्यांनी सांगितले.

जीवनाची वाटचाल यशस्वीरीत्या करा

पुढे श्री. ठाकूर म्हणाले की, सर्वांना प्रेम द्या. तुमच्या कुटुंबियांना सहकाऱयांना प्रेम द्या. आपल्या जीवनाची वाटचाल यशस्वीरीत्या करा. कोरोनामुळे काही करता येत नाही मात्र मे नंतर याचा जोर कमी होईल. त्यानंतर आम्ही लोकांसमोर जाऊन लोकापर्यंत गेल्यास लोक आम्हाला भरभरून प्रेम देईल व ठेवीही देतील. त्या उद्योगाने आम्ही वाटचाल करू असे श्री ठाकूर म्हणाले. 25 वर्षात केलेल्या कामाची कामगिरी घेऊन येणार आहोत. आज हा धडा आर्थिक क्षेत्रात काम करणाऱयांनी घेतला पाहिजे. त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे असे ते म्हणाले. सर्वांवर संकटे येतात आमच्यावरही आली, संकटांना सामोरे जाऊन त्यावर मात केली पण सगळेजण आमच्याबरोबर आहे. आमची एवढी ताकद आहे आम्ही उद्योगात शिरू शकतो व उद्योगातून फायदा मिळू शकतो. आमच्याकडे 1 लाख कर्ज घेतलेले 700 कोटीच्या टप्प्यावर पोचले आहेत. असे होऊ शकते. एका उद्योगाने अनेक उद्योगांना चालना मिळू शकते असे ठाकूर म्हणाले.

राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्तीनी काम करा

तुम्ही जे काम करीत आहेत ते राष्ट्रप्रेम आहे. राष्ट्रभक्तीचा आमच्याकडे अभाव आहे मात्र ती राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न लोकमान्यच्या रुपाने आम्ही करीत आहोत. क्रांतीकारीच्या जीवनाचे एक्झीबिशन (प्रदर्शन) आम्ही एका संग्रालयातून विकत घेतले आहे. तो आम्ही सगळय़ाठिकाणी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. पाच मिनिटाची जरी राष्ट्रभक्तीची ज्योत तुमच्या जीवनात निर्माण झाली तर आयुष्यभर तुम्हाला पुरेल. आज जवान नक्षलवादीकडे भांडण करताना शहीद झाले त्यांचे स्मरण आम्ही ठेवले पाहिजे यासाठी तुम्ही भारून काम करा देशप्रेमाने काम करा. त्यात तुमची प्रगती व्हायला उशीर लागणार नाही असे श्री ठाकूर म्हणाले.

आरोग्याकडे लक्ष ठेवून काम करा

स्वराज्याचे सुराज्य करायचे हे आपल्या सर्वांच्या हाती आहे. सगळय़ांनी आपापला वाटा उचलला तर आपण देशामध्ये दिव्यभव्य करू शकतो. आम्ही अनेक संस्थांना हातभार लावलेला आहे. त्यामध्ये शिक्षण संस्था आहे. हॉस्पिटल आहे. आज आरोग्यदिन आहे आपल्या वाढदिवसाला जागतिक आरोग्यदिन म्हटले आहे. प्रत्येकांनी आपले व आजूबाजूचे आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. आज खेडोपाडय़ात कचऱयाचे ढीग असतात त्याच्यामध्ये आरोग्याला धोका आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या घरीच कचरा जीरवावा. सर्वांनी योगा, व्यायाम केला पाहिजे. आणि महिलांनीही आरोग्याकडे ध्यान द्यावे. एक जरी आजारी असला तर त्यामागे धावावे लागते. प्रत्येक जण आपल्या उत्पन्नात वाढ करत आहोत. त्यामुळे एक वेळ अशी येईल की, लोकमान्यमध्ये काम करण्याचे उत्पन्न कुठल्याही बँकेत काम करणाऱया माणसांच्या तुलनेत जास्त असेल. त्यासाठी तुम्ही प्रयत्न, काम केले पाहिजे. दिवसरात्र मेहनत करायला पाहिजे. आज आपल्या आईची 109 वी जयंती आज आपण सण साजरा करतो तसे वाढदिवस साजरे करतात. काहीजणांचे वाढदिवस घरी साजरे करीत नाही ते आम्ही येथे करतो त्यामुळे आम्हाला कोटी रुपयांचे उत्पन्न येथे झालेले आहे. असे ते शेवटी म्हणाले. यावेळी पुढील महिन्यात होणाऱया रक्तदान शिबिराच्या नामफलकाचे विमोचन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

Related Stories

रेखा पौडवाल यांनी साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त

Amit Kulkarni

भगवद्गीता बालपणातच पोचवण्याचे काम हे राष्ट्रीय महत्त्वाचे

Patil_p

मनोज परब थिवी, वाळपईतून लढणार !

Amit Kulkarni

वादळामुळे रस्त्यावर पडलेली झाडे हटविली

Amit Kulkarni

मागण्या मान्य करण्यास एसीजीएल व्यवस्थापन अनुत्सुक

Amit Kulkarni

पंतप्रधान मोदी 23 रोजी स्वयंपूर्ण मित्रांशी संवाद साधणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!