तरुण भारत

विर्डी साखळीत आज होमकुंड उत्सव.

शुक्रवारी पहाटे देवीचे अग्निदिव्य. 13 दिवशीय शिमगोत्सवाची होणार सांगता.

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

विर्डी साखळी येथील 13 दिवशीय शिमगोत्सवाची शुक्र. दि. 9 रोजी पहाटे श्री सातेरी शांतादुर्गा देवीच्या कळसाने अग्निदिव्य मार्गक्रमण केल्यानंतर सांगता होणार आहे. गावात होळी रोवल्यानंतर नवव्या दिवशी विर्डी गावातील श्री सातेरी शांतादुर्गा देवीचा कळस गावातील लोकांच्या घरांना भेटी देण्यासाठी बाहेर पडतो. चार दिवस घराघरांमध्ये भेटी दिल्यानंतर चौथ्या दिवशी होमकुंड उत्सव साजरा केला जातो. सदर होमकुंड उत्सव आज गुरू. दि. 8 एप्रिल रोजी होणार आहे.

  गेल्या सोम. दि.  5 एप्रिल रोजी संध्याकाळी देवीचा कळस महादेव मंदिरातून बाहेर काढण्यात आला होता. तीन दिवस गावातील विविध वाडय़ांवर भाविकांच्या घरांमध्ये भेटी दिल्यानंतर आज चौथ्या दिवशी देवीचा कळस सकाळी धाटवाडा येथील घरांना भेटी देणार. सायंकाळी च्यारीवाडा येथील घरांना भेटी देऊन झाल्यानंतर तेथे कौलोत्सव होणार आहे. त्यानंतर घाडीवाडा येथील घरांना भेटी दिल्यानंतर तेथेही कौलोत्सव होणार आहे. तत्पूर्वी घाडीवाडा येथे जाताना वाटेत व्याघ्रेश्वर देवाला देवी कौल देणार. घाडीवाडा येथे कौल दिल्यानंतर रात्री कळस भाटातून या पारंपरिक वाटेने महादेव मंदिराजवळ येणार. येथे रचून ठेवण्यात आलेल्या होमकुंडाला वळसा घालून देवीचा कळस देऊळवाडा येथील घरांना भेटी देणार.

  येथील घरांना भेटी दिल्यानंतर वाजत गाजत सर्व व्रतस्थ धोंडगणांच्या सथीने कळसाला होमकुंडस्थळी आणले जाणार.  होमकुंडाला प्रदक्षिणा मारून देवी होमकुंडाला अग्नी देणार व सर्व धोंडगण कळसासह सातेरी शांतादुर्गा मंदिराजवळील तळीवर स्थानासाठी जाणार. पहाटे सर्वप्रथम सर्व धोंडगण व नंतर देवीचा कळस डोक्मयावर घेतलेला मोडपुरूष होमकुंड मार्गक्रमण करणार व नंतर महादेव मंदिराच्या मंडपात सामुहिक कौलोत्सव होऊन देवीचा कळस पुर्ववत मंदारात प्रवेश करणार व या उत्सवाची सांगता होणार.

Related Stories

पाच पालिकांसाठी आज मतदान

Amit Kulkarni

मुंबईत अडचणीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी लवकरच फायर बाईक

Abhijeet Shinde

पणजी शहरातील पे पार्किंगसाठी नऊ जागा अधिसूचित

GAURESH SATTARKAR

मडगावात शनिवारी सरकार विरोधात जाहीर सभा

Omkar B

मांगोरहिलमध्ये वाढते रुग्ण… वाढती अस्वस्थता !

Omkar B

मूलभूत सुविधांच्या अभावी केरीवासियांची फरफट

Patil_p
error: Content is protected !!