प्रतिनिधी / मडगाव
वीज खात्यातर्फे रविवार दि. 11 एप्रिल रोजी शेल्डे, कुंकळळी आणि वेर्णा येथील वीज उपकेंद्रावर वार्षिक दुरूस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजे पर्यंत दक्षिण गोव्याला खंडित वीज पुरवठा होणार आहे. काणकोण, सासष्टी, सांगे, केपे, मुरगांव, धारबांदोडय़ातील किर्लपाल, शिगाव, मोले व फोंडा तालुक्यातील पंचवाडी गावाला खंडित वीज पुरवठा होणार आहे.या खंडित वीज पुरवठय़ाची दखल घेऊन सर्व वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.