22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

एकाच दिवसात तब्बल 527 रुग्ण

सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारांच्या जवळ दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी / पणजी

राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता तीन हजारांच्या जवळ पोहोचत आली असून गत काही दिवसांपासून शंभर, दोनशीच्या संख्येने सापडणाऱया रुग्णसंख्यने बुधवारी चक्क अर्धशतक पार केले. बुधवारी एकाच दिवसात तब्बल 527 रुग्ण सापडले आहेत. राज्यातील विविध आरोग्य केंद्रात दाखल रुग्णांच्या संख्येनेही मोठी झेप घेतली असून मडगाव केंद्रातील रुग्णसंख्या 300च्या जवळ पोहोचली आहे. पणजी परिसरात एकूण 28 रुग्ण सापडले आहेत. भरीस हवाई, रेल व रस्तामार्गे येणाऱया बाधितांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे.

बुधवारी सापडलेल्या 527 रुग्णांद्वारे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 2858 एवढी झाली आहे. 138 रुग्ण बरे झाले तर 24 तासात दोघे दगावल्याने मृतांची संख्या 840 झाली आहे. आतापर्यंत एकूण 60229 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 56531 जण बरे झाले. संशयित रुग्ण म्हणून 51 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले तर 291 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.

 मडगावात सर्वाधिक 295 रुग्ण

सध्या विविध आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱया रुग्णात सर्वाधिक 295 रुग्ण मडगाव केंद्रात आहेत. द्वितीय स्थानी पर्वरी केंद्र आले असून तेथे 273 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पणजी केंद्रात 244, कांदोळीत 238, फोंडय़ात 217, वास्कोत 146, म्हापसात 145, कुठ्ठाळीत 136, शिवोलीत 102, खोर्लीत 93, कासावलीत 86, डिचोली 73, चिंबल 71, सांखळीत 68, सांगे 64, कुडचडे 51, हळदोणे 50, लोटली 49, कुडतरी 47, पेडणे 44 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र 40 पेक्षा कमी रुग्ण आहेत.

एकाच दिवसात सर्वाधिक रुग्णांची भर पडणाऱया केंद्रात पर्वरीत 83, कांदोळी 35, खोर्ली 28, फोंडा 25, या केंद्रांचा समावेश आहे.

सक्रीय रुग्णांची केंद्रवार संख्या पुढीलप्रमाणे आहेः डिचोली 73, सांखळी 68, पेडणे 44, वाळपई 15, म्हापसा 145, पणजी 244, हळदोणा 50, बेतकी 11, कांदोळी 238, कासारवर्णे 24, कोलवाळ 36, खोर्ली 93, चिंबल 71, शिवोली 102, पर्वरी 273, मये 15, कुडचडे 51, काणकोण 32, मडगाव 295, वास्को 146, बाळ्ळी 23, कासावली 86, चिंचिणी 58, कुठ्ठाळी 136, कुडतरी 47, लोटली 49, मडकई 12, केपे 23, सांगे 64, शिरोडा 36, धारबांदोडा 24, फोंडा 217 व नावेलीत 36 रुग्ण आहेत. त्याशिवाय हवाई, रस्ता, रेल्वेमार्गे आलेले 21 प्रवाशी बाधित सापडले आहेत.

  • 07 एप्रिलपर्यंतचे एकूण रुग्ण                    60229
  • 07 एप्रिलपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 56531
  • 07 एप्रिलपर्यंतचे सक्रिय रुग्ण                   2858
  • 07 एप्रिल रोजीचे नवे रुग्ण                      527
  • 07 एप्रिल रोजी बरे झालेले रुग्ण   138
  • 07 एप्रिल रोजीचे बळी               02
  • आतापर्यंतचे एकूण बळी                840

मडगावात भिकाऱयाचा कोरोनामुळे मृत्यू

मडगावच्या पालिका उद्यानासमोर असलेल्या कामत हॉटेलजवळ 27 मार्च 2021  रोजी एक भिकारी मृत अवस्थेत सापडला होता. या भिकाऱयाची स्वॅब टेस्ट केल्यानंतर त्याला कोरोनामुळे मृत्यू आल्याचे स्पष्ट झाले आहे. मडगाव परिसरात आत्तापर्यंत चार भिकाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्या गोव्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून रूग्ण झपाटय़ाने वाढू लागल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे.

 गेल्या चार महिन्यापूर्वी 4 मृत भिकारी सकारात्मक आढळले होते. गेल्यावषी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान दरम्यान कोरोनाचा संसर्ग पसरण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. 27 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण गोव्यामध्ये 29 जणांना मृत्यू आलेल्या अवस्थेत इस्पितळात आणले गेले होते. यातील अनेकांना घरी किंवा इस्पितळात आणताना वाटेत मृत्यू येण्याचे प्रकार घडले होते. तर चार भिकाऱयाचा उघडय़ावर झोपलेल्या ठिकाणी मृत्यू आला होता. या सर्व प्रकरणांमध्ये स्वॅब टेस्ट मृत्यू नंतर केली गेली आणि ती पॉझिटिव्ह आली होती.

कोरोनाची लक्षणे दिसतात इस्पितळात चला

मास्क व सेनिटायझरचा वापर करतानाच, सामाजिक अंतर ठेवणे खुप महत्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे धोक्यांची घंटा असून जर कुणाला सर्दी, ताप येत असेल तर त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या सरकारी इस्पितळात भेट देऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन सरकारतर्फे केले जात आहे. याकडे दुर्लक्ष करू नका कारण वेळीच कोरोनाचे निदान झाल्यास डॉक्टरांना उपचार करणे शक्य होत असते. जर दुर्लक्ष केले तर त्यांचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात, असे आता डॉक्टरच सांगू लागले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ही खुपच खतरनाक व धोकादायक असून झपाटय़ाने रूग्ण वाढू लागल्याने वैद्यकीय यंत्रणेवर सुद्धा प्रचंड ताण आलेला आहे.

Related Stories

शांतादुर्गा किटलकरीण जत्रोत्सवाची आज सांगता

Amit Kulkarni

सत्तरीत कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा निरिक्षकांकडून आढावा

Omkar B

एनसीबीने हेमंत साहाच्या आवळल्या मुसक्या

Amit Kulkarni

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चेन्नई सिटी, आयजॉल एफसीचे विजय

Amit Kulkarni

मुंबईचा पराभव; बेंगलोर 4-1 गोलानी विजयी, छेत्रीचे दोन गोल

Amit Kulkarni

ऊस उत्पादकांच्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!