25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे मृतदेह स्मशानात नेण्यास अडचण

प्रतिनिधी / बेळगाव

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे सुरू आहेत. मात्र ही कामे अर्धवट ठेवण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. येथील ओल्ड पी. बी. रोड, महापालिकेच्या समोरील चव्हाट गल्ली आणि कामत गल्ली स्मशानसमोर खोदाई करण्यात आल्याने मृतदेह स्मशानापर्यंत घेऊन जाणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे मृतदेहाच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  

गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी या ठिकाणी विकासकामाकरिता खोदाई करण्यात आली. मात्र अद्यापही येथील काम पूर्ण करण्यात न आल्याने समस्या निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. याठिकाणी चव्हाट गल्ली आणि कामत गल्लीतील नागरिक स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. तसेच या स्मशानभूमीला एकच रस्ता आहे. त्यामुळे एस. पी. बंगल्याच्या बाजूनेच नागरिकांना स्मशानमध्ये जावे लागते. मात्र स्मशानाच्या गेटसमोरच खोदाई करण्यात आल्याने मृतदेह स्मशानमध्ये घेऊन जाण्यास समस्या निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.

मध्यंतरी चार-पाच दिवस आधी खोदाई करण्यात आल्याने मृतदेह स्मशानपर्यंत घेऊन जाण्यास अडथळा निर्माण झाला. यावेळी मृतदेहाच्या नातेवाईकांसमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी मुस्लीम समाजाच्या स्मशानभूमीमधून मृतदेह घेऊन जाऊन चव्हाट गल्लीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. यावेळी स्मार्ट सिटीच्या दिरंगाईबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

स्मशानभूमीसमोर खोदाई करण्यात आल्यानंतर दोन दिवसांत येथील काम पूर्ण करून देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दहा ते बारा दिवस उलटून गेले तरी येथील काम जैसे थे असल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून लवकरात लवकर येथील काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

विघ्नहर्त्याचे आज आगमन

Patil_p

गोवा-बेळगाव महामार्ग चकचकीत

Amit Kulkarni

ओल्या कचऱयापासून खत निर्मिती प्रकल्पाची चाचणी

Amit Kulkarni

ट्रेझरी कार्यालयातील कर्मचाऱयांना शिक्षक संघाने विचारला जाब

Amit Kulkarni

निपाणीत ‘नागरिकत्व’ विरोधात एकजूट

Patil_p

डॉ. सर्जू काटकर यांना बसवराज कट्टीमनी पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!