22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

जि.पं.-ता.पं.च्या माध्यमातून मतदान जागृती

प्रतिनिधी / बेळगाव

जिल्हा पंचायत अधिकारी आणि तालुका पंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान जनजागृतीसाठी सायकलफेरी काढली. या सायकलफेरीचे उद्घाटन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष दर्शन एच. व्ही. यांनी ध्वज दाखवून केले.

शहरातून सायकलफेरी काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा पंचायत कार्यालयापासून या
रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, पीडीओ वासुदेव र्किक यांच्यासह जिल्हा पंचायत व तालुका पंचायतमधील अधिकारी,  कर्मचाऱयांनी तसेच सायकलपटूंनी या रॅलीमध्ये भाग घेतला होता.

Related Stories

निपाणीत प्राध्यापकाच्या घरावर डल्ला

Patil_p

कचऱयापासून राबविणार वीजनिर्मिती प्रकल्प

Amit Kulkarni

ग्रहण काळ.. बाजारपेठ थंडगार

Patil_p

कर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्णची संख्या ४१ हजार पार ; २४ तासांत बेंगळूरमध्ये ४७ मृत्यू

triratna

खानापूर म.ए. समितीचा शुभम शेळके यांना पाठिंबा

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 66 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Rohan_P
error: Content is protected !!