तरुण भारत

देशात कोरोनाचा कहर! मागील 24 तासात 1 लाख 26 हजार बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या वर्षात पहिल्यांदाच एका दिवसात रुग्णांनी 1.26 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासात देशात 1 लाख 26 हजार 789 नवे रुग्ण आढळून आले. तर 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगळवारी 1.15 लाख नवे रुग्ण आढळून आले होते. 


देशात दुसऱ्या लाटेत कोरोना संकट हे अधिक गडद होताना दिसत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात तब्बल 60 हजारच्या आसपास नवे रुग्ण आढळून आले तर 322 जणांनी आपला जीव गमावला आहे.


बुधवारी देशात 59,258 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 29 लाख 28 हजार 574 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 66 हजार 862 एवढी आहे. तर आतापर्यंत 9 कोटी 01 लाख 98 हजार 673 जणांना लस देण्यात आली आहे. 


सध्या देशात 09 लाख 10 हजार 319 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 18 लाख 51 हजार 393 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आतापर्यंत देशात 25 कोटी 26 लाख 77 हजार 379 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 लाख 37 हजार 781 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 7 एप्रिल 2021) एका दिवसात करण्यात आल्या. 

Related Stories

शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास सरकार स्थापनेला अडचण नाही : सुधीर मुनगंटीवार

prashant_c

कर्नल, मेजरसह पाच जण हुतात्मा

Patil_p

पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 1002 नवे कोरोना रुग्ण; 32 मृत्यू

pradnya p

तेलंगणा : सफाई कर्मचाऱ्याकडून दोन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

prashant_c

लव्ह जिहादविरोधी विधेयक मध्यप्रदेश मंत्रिमंडळात मंजूर

Patil_p

अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार : राहुल गांधी

pradnya p
error: Content is protected !!