तरुण भारत

सेक्टर अधिकाऱ्यांना पोस्टल बॅलेटबाबत सूचना

कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत मतदान प्रक्रिया पार पाडण्याचा सरकारी यंत्रणेवर भर

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. त्याचप्रमाणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणाही तयारीमध्ये गुंतली आहे. शहरातील दोन्ही मतदारसंघांतील अधिकाऱयांना निवडणुकीबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. बुधवारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी सेक्टर अधिकाऱयांची बैठक घेऊन पोस्टल बॅलेटबाबत विविध सूचना केल्या.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशातच पोटनिवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत मतदान प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेवर वाढली आहे. एक हजारहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रातील मतदारांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे 80 वर्षांवरील वृद्धांना, दिव्यांगांना आणि कोरोनाबाधितांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याची नोंदणी करण्यासाठी वृद्धांची यादी तयार करून घरोघरी जावून 80 वर्षांवरील वृद्धांकडून नेंदणी करून घेण्यात आली आहे. सध्या कोरोनाबाधितांनी पोस्टल बॅलेटसाठी नोंदणी केलेली नाही. मात्र, अलीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने मतदानापर्यंत कोरोनाबाधितांकडून पोस्टल बॅलेटची मागणी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणारे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी सेक्टर अधिकाऱयांची बैठक घेतली.

पोस्टल बॅलेटबाबत विविध माहिती देऊन कोरोनाबाधित, वृद्धांची नोंदणी करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत, तसेच बॅलेट पेपर पोहोचविण्याची माहिती यावेळी सेक्टर अधिकाऱयांना दिली. या बैठकीवेळी विविध विभागांचे सेक्टर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

दहावी पुरवणी परीक्षेच्या मूल्यमापनास प्रारंभ

Omkar B

सीमा लाटकर यांची बदली, मिथूनकुमार नवे उपायुक्त

sachin_m

वीजनिर्मिती प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांचा सहभाग

Amit Kulkarni

खानापूर तालुका म. ए.युवा समितीची रचना लवकरच

Amit Kulkarni

गोकाक ग्लॅडिएटर्स संघाचा 11 धावांनी विजय

Patil_p

कणबर्गीतील गटारीचे बांधकाम संक्रांतीनंतर

Omkar B
error: Content is protected !!