25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

शुभम शेळके यांचा झंझावाती प्रचार

सांबरा, कंग्राळी, शाहूनगर परिसरात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

प्रतिनिधी / बेळगाव

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी बुधवारी सांबरा परिसरात झंझावाती प्रचार केला. सांबरा तसेच परिसरातील नागरिकांनी शेळके यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावात प्रचारफेरी काढून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. मराठी भाषा व अस्मितेसाठी सुरू असणाऱया या लढय़ामध्ये हा निर्णायक टप्पा असून मराठी भाषिकांनी समितीलाच मतदान करण्याची साद घालण्यात आली.

प्रारंभी इराप्पा जोई यांच्या हस्ते शुभम शेळके यांचा सत्कार करण्यात आला. तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, काशिनाथ धर्मोजी यांच्यासह ग्रामस्थ व समितीच्या कार्यकर्त्यांनी शेळके यांचे जल्लोषात स्वागत केले. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्याला बळकटी देण्यासाठी या निवडणुकीत म. ए. समितीला सर्वाधिक मताधिक्मय मिळणे आवश्यक आहे. सीमाभागाला म. ए. समितीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मराठीपण टिकविण्यासाठी समितीच्या सिंहाला मतदान करा, असे आवाहन शुभम शेळके यांनी मतदारांना केले. प्रचारफेरीत भुजंग जोई, भुजंग गिरमल, विक्रम सोनजी, मारुती धर्मोजी, पिराजी पालकर, वसंत पालकर, कल्लाप्पा सोनजी, शिवाजी जोगाणी, दौलत जोई, आप्पाजी यड्डी, मोहन हर्जी, हनुमंत हिरोजी, बसवंत पालकर, भरमा चिंगळी, अजय सुतार, शुभम हिरोजी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

कंग्राळी, शाहूनगर परिसरात प्रचार

सायंकाळी शुभम शेळके यांनी एपीएमसी येथील व्यापाऱयांच्या भेटी घेऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर या भागामध्ये प्रचार केला. या परिसरात प्रचारफेरी काढून समितीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रचाराच्या ठिकाणी मोठय़ा जल्लोषात स्वागत करण्यात येत होते.

मजगावात शुभम शेळके यांचा प्रचार : महालक्ष्मी देवीचा घेतला आशीर्वाद : घोषणांनी परिसर दणाणला

बुधवार दि. 7 रोजी दुपारी लोकसभेचे म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी मजगावातील यात्रोत्सवाला भेट देवून श्री महालक्ष्मीला साकडे घातले. यावेळी मजगाव परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बुधवारी निवडणुकीच्या प्रचारार्थ येथील ग्रामस्थांची भेट घेऊन म. ए. समितीच्या सिंहालाच मतदान करण्याचे आवाहन केले. मजगाव व उपनगरातील समितीनिष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी समितीच्या सिंहालाच मतदान करून शुभम शेळके यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी शुभम शेळकेंचा विजय असो, येऊन येऊन येणार कोण, समितीच्या सिंहाशिवाय आहे कोण? अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मजगावचा जाहीर पाठिंबा आहे, असे विचार पांडू पट्टण यांनी व्यक्त केले.

Related Stories

यंदा कोरोनाच्या संकटामुळे गोकुळ जन्माष्टमी साधेपणाने

Patil_p

सौंदत्ती यल्लम्माचे दर्शन आणखी एक महिना नाही

Patil_p

मिरज माहेर मंडळातर्फे तिळगूळ समारंभ

Omkar B

रेल्वे दुपदरीकरणाचे केवळ 10 टक्केच काम पूर्ण

Patil_p

अध्यक्षपदाच्या आरक्षणासाठी मोर्चेबांधणी सुरू

Patil_p

वाहतूक कोंडीतच नादुरुस्त होऊन बस बंद पडली

Omkar B
error: Content is protected !!