25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

खुनानंतर त्याने स्टेटस ठेवले ‘सक्सेसफुल मर्डर’

हलगा येथील खूनप्रकरणी माय-लेकाला अटक : परिसरात खळबळ

प्रतिनिधी / बेळगाव

हलगा येथील विजय उर्फ बाळू जोतिबा सामजी (वय 48) याच्या खूनप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी त्याच गावातील माय-लेकाला अटक केली आहे. खुनानंतर संशयित आरोपीने ‘सक्सेसफुल मर्डर’ असा स्टेटस ठेवल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मनोज उर्फ मोहन मऱयाणी सामजी (वय 21), त्याची आई लक्ष्मी उर्फ भारता मऱयाणी सामजी (वय 46, दोघेही रा. बसवाण गल्ली, हलगा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. बुधवारी दुपारी पोलिसांनी हलगा येथे संशयितांना नेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक एस. हिरेकेंचनगौडा व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. मंगळवारी रात्री मनोज उर्फ मोहन या तरुणाने पाठलाग करून विळय़ाने सपासप वार करून विजयचा भीषण खून केला होता. खुनानंतर या तरुणाने आपल्या आईसह पोलीस स्थानक गाठले व पोलीस अधिकाऱयांसमोर घडला प्रकार सांगितला होता.

पोलीस स्थानकात जाण्यापूर्वी 9.58 ला मनोज उर्फ मोहनने आपल्या व्हाट्सऍपवर सक्सेसफुल मर्डर असे स्टेटस ठेवले होते. पहिल्या स्टेटसमध्ये स्वतःच्या फोटोखाली मुस्टी, जांबिया व मनगटातील बळ दाखविले होते. दुसऱया स्टेटसमध्ये सक्सेसफुल मर्डर असे लिहिण्यात आले होते. बुधवारी सोशल मीडियावर स्टेटसचे स्क्रीन शॉट फिरत होते.

मनोज उर्फ मोहनने विजयचा खून कशासाठी केला? याचा तपास सुरू आहे. विजय हा आपल्या आईला सातत्याने त्रास देत होता. मंगळवारी रात्रीही याच मुद्दय़ावरून दोघांमध्ये कडाक्मयाचे भांडण झाले होते. भांडणानंतर पाठलाग करून विजयचा खून करण्यात आला आहे. हिरेबागेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या खूनप्रकरणी अटक केलेल्या माय-लेकाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Related Stories

सावरकर रोड, टिळकवाडी येथे पाणी वाया जात असल्याने नाराजी

Patil_p

वीज खांब उचलण्याची जबाबदारी कोणाची?

Patil_p

न्यायालये गजबजली मात्र पक्षकारांना प्रवेशबंदी

Patil_p

हुबळीच्या व्यापाऱ्याचा केरळमध्ये कोरोनाने मृत्यू

triratna

अलतगा येथे शाळा दोन सत्रात भरविण्याचा निर्णय

Patil_p

कोरोना काळात लॅब टेक्निशियनची सेवा कौतुकास्पद

Omkar B
error: Content is protected !!