तरुण भारत

काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटकून कामाला लागावे

डी.के.शिवकुमार यांनी घेतली बैठक

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे राज्य अध्यक्ष डी. के. शिवकुमार बेळगावला दाखल झाले. त्यांनी काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आमचा विजय निश्चित आहे. उर्वरित दिवसांमध्ये प्रचार करण्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना आतापर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचाच विजय होणार आहे. तेव्हा गाफील न राहता कार्यकर्त्यांनी प्रचार करावा आणि सतीश जारकीहोळी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने बुधवारी विविध ठिकाणी प्रचार केला. यावेळी माजी मंत्री एच. के. पाटील हेही उपस्थित होते. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी काँग्रेसला मतदान करावे, अशी विनंती मतदारांना केली. भर उन्हामध्ये सौंदत्ती, बैलहोंगल आदी तालुक्मयांमध्ये बुधवारी प्रचार केला. प्रचारानंतर तातडीने डी. के. शिवकुमार यांनी बैठक घेतली.

काँग्रेसला आतापर्यंत उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार अपयशी सरकार आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे. त्यामुळे निश्चितच काँग्रेसला मते मिळणार आहेत. असे असले तरी गाफील न राहता योग्य प्रकारे प्रचार करून सतीश जारकीहोळी यांना विजयी करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, माजी आमदार फिरोज सेठ, राजू सेठ, वीरकुमार पाटील, जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आशा ऐहोळे, अनिल पोतदार, जयराज हलगेकर, किरण पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

भुतरामहट्टीतील सिंहांचे पर्यटकांना लवकरच होणार दर्शन

Amit Kulkarni

एपीएमसीत कवडीमोल दराने भाजीची विक्री

tarunbharat

लोकमान्यच्या भाग्यनगर शाखेमध्ये महिला दिन

Amit Kulkarni

कोरोनाग्रस्त आरोपीमुळे कॅम्प पोलीस स्थानकाला टाळे

Patil_p

वनखात्यातर्फे रोप लागवडीला प्रांरभ

Patil_p

स्वर मल्हारतर्फे आज शास्त्रीय गायन मैफल

Patil_p
error: Content is protected !!