25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

नवी गल्ली शहापूरचा शुभम शेळकेंना पाठिंबा

अधिकाधिक मतदानासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार

प्रतिनिधी / बेळगाव

नवी गल्ली, शहापूर येथील वायुपुत्र सेना मंडळाच्यावतीने मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. पंच कमिटीचे अध्यक्ष दशरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषिकांचा प्रतिनिधी आता दिल्लीत पाठवायची वेळ आली असून अधिकाधिक मतदानासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

माजी नगरसेवक नेताजी जाधव म्हणाले, मराठी भाषिकांवर होणारे अन्याय थांबविण्यासाठी आता भगव्या ध्वजाखाली एकत्र येणे गरजेचे आहे. उमद्या तरुणाला उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रीय पक्षांकडे वळलेले मराठी भाषिक तरुण आता पुन्हा समितीमध्ये येत आहेत. मराठा भाषा व संस्कृती टिकवायची असल्याने सिंह चिन्हासमोरील बटण दाबून शुभम शेळके यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी नगरसेवक संजय शिंदे, अमृत भाकोजी, रवी साळुंखे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते व मराठी भाषिक उपस्थित होते.

Related Stories

जिलेटिनच्या भीषण स्फोटात पाच ठार

Amit Kulkarni

आरएसएसचे राजशेखर हिरेमठ यांचे निधन

Patil_p

खानापूर तालुक्यात स्वाती पाटील, लक्ष्मी नाईक, कार्तिक अंबोजी विजयी

Amit Kulkarni

ग्रा.पं.वर सरकारनियुक्त अधिकाऱयांना मार्गदर्शन

Patil_p

रविवारी 75 जण कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

नाईट पार्किंगला दुसरे विमान दाखल

Patil_p
error: Content is protected !!