22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

घरफोडीच्या घटनेनंतर पाच दिवसात आरोपीला अटक

एपीएमसी पोलिसांची कारवाई : 23 लाखांचा ऐवज जप्त

प्रतिनिधी / बेळगाव

संगमेश्वरनगर येथील एका बंद घराच्या पाठीमागच्या दरवाजाला लावलेला कुलूप बनावट चावीने उघडून 470 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1 लाख रुपये रोख रक्कम पळविली होती. या घटनेनंतर पाच दिवसात गुन्हेगाराच्या मुसक्मया आवळण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले आहे. उत्तरप्रदेशमधील एका तरुणाला अटक करून 23 लाखांचा ऐवज जप्त केला. मोहम्मदसलमान नसीरअहम्मद अन्सारी (वय 22, मूळचा रा. सिकंदरपूर, जि. बस्ती, उत्तरप्रदेश, सध्या रा. केआयएडीबी-होनगा) असे त्याचे नाव आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास विभागाचे पोलीस आयुक्त मुत्तुराज, मार्केटचे प्रभारी एसीपी एन. व्ही. बरमनी यांनी ही कारवाई केली आहे.

एपीएमसीचे पोलीस निरीक्षक दिलीपकुमार के. एच., उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, दीपक सागर, शंकर कुगटोळी, नामदेव लमाणी, केंपान्ना दोडमनी व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, फिंगरप्रिंट विभागाचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, उपनिरीक्षक तबरेज बागवान व त्यांच्या सहकाऱयांनी सतत पाठपुरावा करून या चोरी प्रकरणाचा तपास लावला आहे. पोलीस आयुक्तांनी त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

3 एप्रिल 2021 रोजी येथील एपीएमसी पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 एप्रिलच्या रात्री 9.15 ते 11 यावेळेत संगमेश्वरनगर येथील एका बंद घराच्या पाठीमागील दरवाजाला लावलेले कुलुप बनावट चावीने उघडून चोरी करण्यात आली होती. गौसमोदीन मैनुद्दीन तोरगल यांनी फिर्याद दिली होती. त्यांची बहीण जाफरीयाबानु यांच्या घरी चोरीचा हा प्रकार घडला होता.

गौसमोदीन यांची बहीण व भावोजी लग्नसमारंभासाठी गेले होते. नातीच्या लग्नासाठी आणलेले दागिने तिजोरीत ठेवून कोणाला संशय येवू नये म्हणून दर्शनी दरवाजाला आतून कडी लावून पाठीमागील दरवाजाला बाहेरून कुलुप लावण्यात आला होता. मात्र बनावट चावीच्या साहाय्याने कुलुप उघडून 470 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1 लाख रुपये रोख रक्कम चोरटय़ाने पळविले होते. पोलिसांनी चोरीचे सर्व दागिने जप्त केले असून 60 हजार रुपये ताब्यात घेतले आहेत.

रक्कम बँकेत ठेवली

एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या मोहम्मदसलमान हा काळय़ा यादीतील अट्टल गुन्हेगार आहे. जाफरीयाबानु यांच्या घरात चोरण्यात आलेल्या 1 लाख रुपयांपैकी 60 हजार रुपये त्याने आझमनगर येथील एका बँकेत ठेवले होते. पोलिसांनी ती रक्कम जप्त केली आहे. एकूण 23 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिंगरप्रिंट व मोबाईल टॉवर लोकेशनवरून चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे.

Related Stories

विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा

Amit Kulkarni

कुप्पटगिरीजवळ मलप्रभा काठावरील विद्युतखांब उन्मळून पडल्याने पिके धोक्यात

Omkar B

बेळगावच्या सुपुत्राची कॅप्टनपदी निवड

Patil_p

हुंचेनट्टीतील क्रिकेट स्पर्धेत खादरवाडीचा शिवसेना संघ विजयी

Omkar B

कर्नाटकातील दहशतवादी कारवायांवर नियंत्रण – गृहमंत्री बसवराज बोम्मई

Rohan_P

नैर्त्रुत्य रेल्वेने 3 लाख मजुरांना पोहचविले गावी

Patil_p
error: Content is protected !!