22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

बुधवारी जिल्हय़ात 122 जणांना कोरोना

बेळगाव शहर-उपनगरांतील 86 जणांचा समावेश; सहा मुले, सहा डॉक्टरांना लागण

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना रुग्णसंख्येने बुधवारी शंभरी पार केली. बेळगाव शहर व उपनगरांतील 86 जणांसह 122 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सहा डॉक्टर व सहा लहान मुलांचा समावेश आहे. जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील 22 विद्यार्थ्यांना लागण झाली आहे.

या वर्षातील उच्चांकी रुग्णसंख्या बुधवारी नोंद झाली आहे. त्यामुळे बेळगावकरांना धक्काच बसला असून आरोग्य विभागही खडबडला आहे. बुधवारी शहर व उपनगरांतील अनेक ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हिंडलगा, पिरनवाडी, गणेशपूर, मारिहाळ, काकती येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सांबरा एटीएसमधील दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जेएनएमसी हॉस्टेलमधील 22 विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण वैद्यकीय व दंत वैद्यकीय विभागाचे विद्यार्थी आहेत. दोन हॉस्टेलमध्ये राहणाऱया विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या परिसरात व्यापक खबरदारी घेण्यात आली आहे. याबरोबरच कुवेंपूनगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, शहापूर, हनुमाननगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

रामतीर्थनगर, सदाशिवनगर परिसरात रुग्णसंख्या वाढती आहे. न्यू गांधीनगर, शिवबसवनगर, श्रीनगर, शिवाजीनगर, राणी चन्नम्मानगर, फॉरेस्ट कंपाऊंड, आदर्शनगर, अशोकनगर, पोलीस हेडक्वॉर्टर्स, कॅम्प, वंटमुरी, टिळकवाडी, राणी चन्नम्मानगर, क्लब रोड, लक्ष्मी टेकडी, नेहरुनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

गोकाक, अथणी, यमकनमर्डी, खानापूर, रायबाग, चिकोडी, निपाणी, सदलगा, बैलहोंगल, मांगूर, सुतगट्टी, उगरगोळ, मुनवळ्ळी, हुक्केरी, संपगाव, नागनूर, कल्लोळी येथेही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 52 ते 56 पर्यंत एका दिवसाची रुग्णसंख्या पोहोचली होती. बुधवारी 122 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 36 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 763 इतकी झाली आहे. त्यापैकी 27 हजार जणांनी कोरोनावर मात केली असून सक्रिय रुग्णांची संख्या 398 वर पोहोचली आहे. अद्याप 2 हजार 349 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. तर जिल्हय़ात 36 हजार 459 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. लक्षणे आढळून आल्यास त्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे.

मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित

जेएनएमसी हॉस्टेलमधील 22 विद्यार्थी, विद्यार्थिनींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागाने हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. तालुका आरोग्याधिकाऱयांनी बुधवारी सायंकाळी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. केएलई कॅम्पसमधील डेन्टल कॉलेज मेन रोड, कर्नाटक हॉस्टेल, बेबी सिटींग हॉल व जिल्हा क्रीडांगण, पीएनपी हॉस्टेल परिसरात कंटेन्मेंट झोन जारी करण्यात आला असून या परिसरात व्यापक खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने स्वॅब तपासणीचा 6 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. आतापर्यंत 6 लाख 8 हजार 593 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 68 हजार 593 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Related Stories

बेंगळूर : सिटी मॉल्समध्ये येणाऱ्या नागरिकांची ‘स्मेल टेस्ट’ करा : महापौर

triratna

फुलबाग गल्ली येथे तुंबले गटारीचे पाणी

Amit Kulkarni

पाऊस ओसरला तरीही धास्ती कायम

Patil_p

दिव्यांनी सजला कपिलेश्वर मंदिर परिसर

Patil_p

…राज्यमंत्र्यांनाही करू दिले नाही अभिवादन

Rohan_P

मंडोळीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाच्या कंपाऊंडचे उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!