तरुण भारत

कोरोना प्रोटोकॉलचे पालन न केल्याने हॉटेल, सुपरमार्केट सील

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात दिवसागणिक कोरोनाची संख्या वाढत आहे. दररोज वाढणारी कोरोनाची संख्या प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.

दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बेंगळूर शहरी जिल्ह्यात नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. परंतु काही ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. दरम्यान बृह बेंगळूर महानगरपालिकेने (बीबीएमपी) कोविड -१९ प्रोटोकॉलचे पालन न केल्याबद्दल हॉटेल आणि इतर व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरू केली आहे.

कोरोना नियमांचे पालन न केल्याने बीबीएमपी अधिकाऱ्यांनी सुपरमार्केटसह पाच आस्थापने बंद केली आहेत. बीबीएमपीच्या म्हणण्यानुसार मल्लेश्वरममधील दोन, चामराजपेटमधील एक आणि आर. आर. नगरातील एक रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

हुबळी रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार

Shankar_P

राज्यात मागील चोवीस तासांत 52 कोरोनाबळी

Amit Kulkarni

तुमकूरच्या सिरा मतदारसंघातून डॉ. राजेश गौडा यांना तिकीट

Patil_p

प्रख्यात कन्नड कवी एन. एस. लक्ष्मीनारायण भट्ट यांचे निधन

Shankar_P

पीपीई किट परिधान करून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह

triratna

केएसआरटीसी : तामिळनाडू बस सेवेत वाढ

triratna
error: Content is protected !!